Rice Production : यावर्षी देशाच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं होते. मात्र, काही ठिकाणी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा तांदळाच्या उत्पादनावरही (Rice Production) परिणाम होणार आहे. भाताच्या लागवडीत घट झाल्यामुळं चालू खरीप हंगामात (Kharif season) भारताचे तांदळाचे उत्पादन 10 ते 12 दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता, अन्न सचिव सुधांशू पांडे (sudhanshu pandey) यांनी व्यक्त केली आहे. 


खरीप हंगामात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते


यंदा देशात भात लागवडीच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्याचा परिणाम तांदळाच्या उत्पादनावर होणार आहे. चालू खरीप हंगामात भारताचे तांदळाचे उत्पादन 10 ते 12 दशलक्ष टनांनी कमी होऊ शकते, अशी माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत 38 लाख हेक्टर भातशेती कमी झाली आहे. विविध राज्यांमध्ये पावसाचा अभाव हे तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होण्याचे प्रमुख कारण आहे. भारताच्या एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा जवळपास 80 टक्के आहे. खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, यंदा तांदळाच्या उत्पादनात 10 ते 12 दशलक्ष टन नुकसान होऊ शकते. दरम्यान, हवामानातील बदलाचा गहू आणि तांदूळ या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. 


 2021-22 या वर्षात एकूण 130.29 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन अपेक्षित


दरम्यान, दुसरीकडे मुबलक पाऊस असलेल्या राज्यांमध्ये तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. 2021-22 (जुलै-जून) या पीक वर्षात एकूण 130.29 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन अपेक्षित असल्याचे सुधांशू पांडे म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा मोफत अन्नधान्य कार्यक्रम सरकार सुरु ठेवणार का? असा प्रश्न देखील अन्न सचिवांना प्रसारमाध्यांनी केला. यावेळी त्यांनी  या प्रश्नाला उत्तर देणं टाळले.


2021-22 मधील उत्पादन मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा 25 दशलक्ष टनांनी जास्त असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, रेपसीड, मोहरी, तेलबिया आणि उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: