Horoscope Today, September 10, 2022 : आज भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. शतभिषा नक्षत्र असून, चंद्र कुंभ राशीत आहे. आजपासून पितृपक्षाच्या पंधरवड्याला सुरुवात होत आहे. मेष राशीचे लोक आर्थिक समस्यांमधून मुक्त होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. चांगल्या कामांसाठी तुमचे कौतुक होईल. वाद सुरु असतील तर, ते सोडवण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या यशामुळे कुटुंबातील सदस्यही आनंदी राहतील. जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील, तर आज तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता.
वृषभ (Taurus Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. यशासोबत आनंद मिळेल आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने घराबाहेर पडून कोणतेही रखडलेले काम पूर्ण करता येईल. अनेक ठिकाणी लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ देव दर्शन आणि पुण्य कामात जाईल.
मिथुन (Gemini Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगती होईल. पण, धावपळ जास्त होईल. प्रवासाची योजना आखू शकता. संतती सुखात वाढ होईल. खर्च कमी होतील. आत्मविश्वास वाढेल. वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्ही नकारात्मक मानसिकतेमुळे निराशा अनुभवाल. तब्येत बिघडण्याची शक्यता राहील. तुम्हाला तुमच्या रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशीही मतभेद होऊ शकतात. नवीन नातेसंबंध तुमच्या अडचणी वाढवू शकतात. आर्थिक बाबतीत अडचणी येतील.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याची योजना देखील बनवू शकता. शारीरिक समस्या दूर होतील. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही घर, दुकान इत्यादी खरेदी-विक्रीचा विचार करत असाल, तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. शत्रू तुमच्या अडचणी वाढवत राहतील.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्हाला जे हवे, ते मिळेल. मात्र, अधिकार वाढले की तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च कराल. मनापासून इतरांची सेवा केल्याने लाभ मिळेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सरकारी कामात सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
तूळ (Libra Horoscope) : आज तुम्हाला मनःशांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. कामात काही अडचणी येऊ शकतात. नोकरीतील बदलामुळे प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढतील. काही जबाबदाऱ्या पूर्ण होतील. घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक काळजीने मन अस्वस्थ होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना काळजी घ्या. कुटुंबात छोट्या वादातून मोठे भांडण निर्माण होऊ शकते. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेमुळे चिंता राहील. आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे मन रमणार नाही. सहकार्य न मिळाल्याने मन उदास राहील. तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काही आव्हाने घेऊन येईल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायात तुमची फसवणूक होऊ शकते. कुटुंबात सुसंवाद राहील. मनातील गोंधळामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. कुटुंबात पूजापाठाचे आयोजन करता येईल. कुटुंबातील सदस्य आज तुम्हाला एखादी विनंती करू शकतात, जी तुम्हाला पूर्ण करावी लागेल.
मकर (Capricorn Horoscope) : घरात पाहुण्यांची ये-जा राहील. मित्र आणि कुटूंबींयांसोबत सुरू असलेला एखादा वाद आज मिटू शकतो. कोणत्याही परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल सांगताना नकारात्मक शब्द वापरू नका. अन्यथा, काही छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. अनुभवाशिवाय कोणतेही काम करू नका. व्यवसायात घेतलेल्या निर्णयांमध्ये सुरुवातीला अडचणी येऊ शकतात.
कुंभ (Aquarius Horoscope) : कुंभ राशीच्या लोकांनी आज प्रत्येक बाबतीत संयमाने आणि सावधगिरीने काम करावे. घाईघाईने केलेल्या कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन कामात पैसे गुंतवू शकता. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे जाणून घ्या. संतती, नोकरी, विवाह इत्यादी शुभ कार्यासाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळेल.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा त्रासदायक असेल. समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल आणि मनात अस्वस्थता असेल. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊ शकतात. आर्थिक योजनांमध्ये हुशारीने गुंतवणूक करावी लागेल, अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागेल. तणावामुळे डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या