All India Consumer Price Index : एप्रिल 2022 साठी कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (All India Consumer Price Index) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येकी 10 अंकांनी वाढ झाली असून अनुक्रमे 1 हजार108 आणि 1 हजार 119 पर्यंत पोहोचला आहे. शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या सर्वसामान्य निर्देशांकात अनुक्रमे 7.32 आणि 7.13 पर्यंत झालेली वाढ मुख्यत्वे खाद्यान्नाच्या गटामुळे झाली आहे. तांदूळ, कणीक (गव्हाचे पीठ), ज्वारी, बाजरी, नाचणी भाज्या, फळे इत्यादींच्या किंमती वाढल्यामुळे ही वाढ दिसून येत आहे.



निर्देशांकातील वाढ आणि घट राज्या-राज्यांत वेगवेगळी आहे. शेतमजुरांबाबत, निर्देशांकात 19 राज्यांमध्ये 1 ते 20 अंकांची वाढ नोंदली गेली तर तमिळनाडूमध्ये 7 अंकांची घट झालेली दिसून आली. 1 हजार 275 अंकांसह   तामिळनाडू निर्देशांकाच्या सारणीत सर्वोच्च स्थानावर आहे. तर 880 अंकांसह हिमाचल प्रदेश सर्वात खालच्या स्थानावर आहे. ग्रामीण मजुरांच्या बाबतीत निर्देशांकात 19 राज्यांमध्ये 2 ते 19 अंकांची वाढ दिसून आली आहे. तर तामिळनाडूमध्ये 7 अंकांची घट झाली आहे. 1 हजार 263 अंकांसह तमिळनाडू निर्देशांकाच्या सारणीत सर्वोच्च स्थानावर आहे तर 931 अंकांसह हिमाचल प्रदेश तळाशी आहे.


शेतमजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांक वाढीत केरळ आघाडीवर


राज्यांमध्ये शेतमजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकातील (CPI-AL) सर्वाधिक वाढ केरळमध्ये (20 अंक) झाली आहे. तर ग्रामीण मजुरांच्या बाबतीत (CPI-RL) केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना (19 अंक) हा अनुभव आला. मुख्यत्वे तांदूळ, डाळी, ताजी/ सुकी मासळी, भाज्या व फळे, कणीक, बाजरी, सरपण, सुती कापड (गिरणीचे), प्लॅस्टिकची पादत्राणे इत्यादी महाग झाल्याने ही वाढ दिसून आली. तर याउलट, तामिळनाडूमध्ये शेतमजूर आणि ग्रामीण मजूर दोन्हींसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (सात-सात अंकांची) घट दिसून आली आहे. यामागे मुख्यत्वे तांदूळ, ताजी/ सुकी मासळी, कांदे आणि भाज्या व फळे यांमधील स्वस्ताई हे कारण होते.


महागाईवाढीच्या दराचा गेल्या महिन्याच्या तुलनेत विचार करता, एप्रिल 2022 मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक कृषी मजूर आणि अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ग्रामीण  मजूर CPI-RL अनुक्रमे 6.44 टक्के व 6.67 टक्के इतके आहेत. तर मार्च 2022 मध्ये ते अनुक्रमे 6.09 टक्के व 6.33 टक्के इतके होते. गेल्यावर्षी याच महिन्यात ते अनुक्रमे 2.66 टक्के आणि 2.94 टक्के इतके होते. त्याचप्रमाणे, खाद्यान्नाबाबतची महागाई एप्रिल 2022 मध्ये अनुक्रमे 5.29 टक्के व 5.35 टक्के इतकी होती. मार्च 2022 मध्ये तिचे दर अनुक्रमे 4.91 टक्के व 4.88 टक्के इतके होते तर गेल्यावर्षीच्या याच महिन्यात ते दर अनुक्रमे 1.24 टक्के आणि 1.54 टक्के इतके होते.


महत्वाच्या बातम्या: