Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील साखरा शिवारातील शेतकरी अतुल राऊत यांना यंदा तुरीच्या पिकातून लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे. तुरीच्या झाडांना शेंगा न लागल्याने निराश झालेल्या राऊत यांनी तब्बल दहा एकर तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागलाय.तुरीला बाजारात नेहमीच चांगला भाव मिळतो, या आशेने अतुल राऊत यांनी आपल्या 10 एकर शेतीत तुरीची लागवड केली होती. लागवडीनंतर त्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकाची काळजी घेतली. योग्य प्रमाणात खते, फवारणी, आणि इतर शेतीसाठी आवश्यक ती साधने वापरली होती. मात्र, हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे राऊत यांची मेहनत वाया गेली.
10 एकरवर तुरीवर रोटावेटर
इतर पिकांच्या तुलनेमध्ये तुरीच्या पिकाला बाजारात चांगला भाव मिळतो या अपेक्षेने हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील शेतकरी अतुल राऊत यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेती पैकी दहा एकर शेतीवर तूर या पिकाची लागवड केली होती. लागवड केल्यानंतर हजारो रुपये खर्च करून पिकाची जोपासना सुद्धा राऊत यांनी चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामध्ये खते यासह फवारण्यावर शेतकऱ्याचा मोठा खर्च झाला होता. असे असताना सुद्धा शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. परंतु, झाडांना फुले लागल्यानंतर शेंगा लागण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रादुर्भाव या तुरीच्या पिकावर झाल्याचे पाहायला मिळालं. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे तुरीच्या पिकाचे फुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात गळून पडले, त्यामुळे तुरीच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. काही दिवस थांबूया नंतर तरी शेंगा लागतील या अपेक्षाने शेतकऱ्याने तुरीच्या कापणीच्या वेळेपर्यंत वाट पाहिली. पणए तुरीच्या पिकाला शेंगा लागल्या नाही त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने आज चक्क 10 एकर असलेल्या तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. या शेतामधून शेतकऱ्याला साधारणतः साडेतीन ते चार लाख रुपयाच उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु, आता एक रुपयाचाही उत्पन्न आपल्या हाती लागणार नाही हे समजताच शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बारदाना अभावी सोयाबीन खरेदी रखडली
सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. एका बाजुला सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि दुसऱ्या बाजुला सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीनची खऱेदी करण्यासाठी होणारा विलंब. या दोन्ही कारणामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अशातच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडलेली असल्याने संतप्त शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेऊन केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.चिखली तालुक्यातील सोमठाना खरेदी केंद्रावरील प्रकार शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर सावळे रा. डोंगरशेवली अस शेतकऱ्याच नाव आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच खरेदी केंद्रावर बारदाना अभावी सोयाबीन खरेदी रखडल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
हेही वाचा:
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न