Parbhani Agriculture News : राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाचा (Rain) शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं मातीमोल झाली आहेत. सोयाबीनसह (soybean) कापूस (Cotton) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातही या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन, कापूस, फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबतचे वृत्त एबीपी माझानं दिलं होते. तत्काळ त्याची दखल घेत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी  नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.


बांधावर जाऊन कृषी आणि महसूलच्या पथकाला पंचनामे करण्याचे आदेश 


परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दखल घेत जिल्हा प्रशासनाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी आणि महसूलच्या पथकाला पंचनामे करण्याचे आदेश सावंत यांनी दिले आहेत. एबीपी माझाने नुकसानीचा ग्राउंड रिपोर्ट दाखवला होता. याची प्रशासनानं दखल घेतली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर परभणी जिल्ह्यात (Parbhani District) आतापर्यंत सरासरीच्या 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळं सोयाबीन, कापूस, फळबागांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 


ठिकठिकाणी सोयाबीनला फुटले कोंब


शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील आठ मंडळात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झालाय होता. यामुळेच शेतकऱ्यांचे काढणीला आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात गेले. ठिकठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असून, यासोबतच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच संत्रा, मोसंबी, सीताफळ बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळं सरकारने तत्काळ पीक विम्यासह, भरीव मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परभणीच्या जांब मंडळातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


मराठवाड्यातील  लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांना मोठा फटका


मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे काढणीला आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात मिळाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा फटका, आजही राज्यात पावसाची शक्यता