Grape Production : सध्या देशात मोठ्या प्रमाणात तापमानात (Temperature) वाढ होत आहे. वाढतं तापमान हे सर्वच गोष्टींसाठी धोकादायक आहे. मानवी आरोग्यासह शेती पिकांना देखील या वाढत्या तापमानाचा फटका बसतोय. सध्या वाढत्या तापमानामुळं द्राक्ष (Grape) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: तामिळनाडू राज्यातील द्राक्ष उत्पादकांना (Grape Production ) तापमान वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास 80 टक्क्यांहून अधिक द्राक्ष उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 


वाढत्या तापमानामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत (Temperature)


तामिळनाडू राज्यात वाढत्या तापमानामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात पन्नीर थिराचाई आणि ओडैपट्टी सीडलेस द्राक्षे या दोन मुख्य द्राक्षाच्या जाती आहेत. साधारणपणे एका एकरात 10-12 टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षीत असते. मात्र, यावेळी तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने एकरी उत्पादन तीन टनांपेक्षा कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे 80 टक्क्यांनी उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


द्राक्ष पिकासाठी किमान आधारभूत 50 रुपये प्रति किलो ठरवावी


शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एकर द्राक्ष बागेला साधारणत:1 लाख 25 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. यामध्ये जर उत्पादनात मोठी घट आली तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट आल्यामुळं सर्वच शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, पिकांचे नुकसान होत असताना राज्य सरकारने ऊस आणि धानासाठी केली होती तशी द्राक्ष पिकासाठी किमान आधारभूत 50 रुपये प्रति किलो ठरवावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केलीय. दरम्यान, शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाला किलोला केलेली 50 रुपयांची मागणी सरकार आता मान्य करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


देशातील तापमानात सातत्यानं वाढ 


सध्या देशातील तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. कुठं उष्णतेचा तडाखा आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस देखील झालाय. पण यावर्षीचा उन्हाळा खूप त्रासदायक आहे. कारण देशातील बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाती काहीली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या तापमान वाढीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होतोय. शेती क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज