Santosh Bangar : शेतकऱ्यांच्या (Farmers) पिक विमा (Pik Vima) प्रश्नावरून आमदार संतोष बांगर (MLA Sanjay Bangar) आक्रमक झाले आहेत. चार दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही, असा सज्जड दम आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला आहे. पुढच्या चार दिवसात पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आक्रमक होईल असा इशारा आमदार बांगर यांनी दिला.
पावसामुळं पिकांचं झालं मोठं नुकसान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी जून, जुलै, सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत होते. पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करुनसुद्धा पिक विमा मिळत नसल्याने आज आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट घेतली. कृषी अधीक्षकांना पिक विमा प्रश्नावरुन चांगलेच धारेवर धरले होते. जर पुढील चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही, असा सज्जड दम यावेळी आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला आहे. चार दिवसात पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आक्रमक होईल असा इशारा आमदार बांगर यांनी यावेळी दिला.
काय आहे पीक विमा योजना
शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसान. या झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नैसर्गीक संकटाचा दरवर्षी शेतकऱ्यांना फटका बसतो. शेतकऱ्यांची उभी पिकं यामुळं वाया जातात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सरकारने सुरु केली आहे. महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल केला आहे. नवीन बदलांनुसार, सर्वसमावेशक पीक विमा योजना पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला; हेक्टरी मिळाली एवढी मदत