Forbes India Rich List 2023: फोर्ब्सने भारतातील 100 सर्वात जास्त श्रीमंत लोकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. शेतकरी आणि श्रीमंती हा शब्द आपण क्वचितच ऐकतो. पण हे सत्य आहे. पाहुयात जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याचा मुलगा कोण आहे. त्याची संपत्ती नेमकी किती आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने पुन्हा एकदा भारतातील 100 श्रीमंत लोकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. लोक नेहमी या यादीची वाट पाहत असतात. त्यात पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे जाणून घेणे नेहमीच मनोरंजक असते. यावेळची यादी खास आहे कारण यावेळी या यादीत अशा तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे, की ज्यांना या यादीत प्रथमच स्थान मिळवले आहे. या तीन नावांपैकी एका व्यक्तीचे नाव आहे जो एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण त्याच्या मेहनतीमुळे आणि कर्तृत्वाने आज फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याचा मुलगा केपी रामासामी
केपी रामासामी हे कापड आणि साखर उत्पादक केपीआर मिलचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत रामासामी यांचा 100 वा क्रमांक लागतो. ते सध्या 74 वर्षांचे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19 हजार 133.7 कोटी रुपये आहे.
कापड आणि साखर उद्योगात विशेष स्थान
केपी रामासामी यांच्या आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ते मुळात शेतकऱ्याचा मुलगा आहेत. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले नव्हते. 1984 मध्ये त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या कापड निर्यात व्यवसायाचा पाया घातला, त्यामध्ये त्यांनी यश मिळवले. यानंतर त्यांनी 2013 मध्ये साखर उत्पादन सुरू केले. साखर निर्मितीच्या जगात आपला पाय रोवला. आज केपीआर मिलमध्ये कपडे आणि साखरेव्यतिरिक्त इथेनॉलचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
फोर्ब्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे?
भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रामासामी हे 100 व्या क्रमांकावर आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमीप्रमाणेच यावेळीही रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर असून एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: