Kharach Tich Kay Chukla : 'खरंच तिचं काय चुकलं?' (Kharach Tich Kay Chukla) ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रोशन विचारे (Roshan Vichare) या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


नाटक-मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपलंसं करणारा एक गोड चेहरा म्हणजे रोशन विचारे. अलीकडेच आलेल्या 'खरंच तिचं काय चुकलं?' या रहस्यमय मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला रोशन पाहायला मिळणार आहे. 


'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन दिसणार वेगळ्या भूमिकेत


रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे. श्रेयस अग्निहोत्री... गडगंज श्रीमंत होतकरू तरुण... आभा निवासचा एकुलता एक वारस, अशी ख्याती असणारी ही व्यक्तिरेखा रोशन आपल्या अभिनयातून उत्तमरीत्या साकारतो आहे. 
             
अग्निहोत्रींच्या घरची सून आभाच व्हायला हवी, अशी तिच्या आईची इच्छा आहे. आभा निवासची खरी मालकीण आभाच आहे, हे वेळोवेळी अधोरेखितही केलं गेलं आहे. पण श्रेयसच्या मनाची मालकीण कोण आहे.. आभा की कुहू..? हे एक कोडंच आहे. आभा निवासशी आभाचा काय संबंध आहे, याचं रहस्य अजूनही उलगडलेलं नसताना आभा आणि कुहू या दोन बहिणींच्या आयुष्यात झालेला श्रेयसचा प्रवेश आणखी पेच वाढवणारा ठरणार आहे. 






श्रेयसच्या येण्याने मालिकेत भरले जाणार प्रेमाचे रंग


श्रेयसच्या येण्याने 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चित. मालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन श्रेयस काय रंग भरतो, हे बघणं आता रंजक ठरेल. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी मराठीवरील 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जातोय. त्यातले काही छुपे गूढ पत्ते एक-एक करून आपल्या मनाचा ठाव घेणार आहेत, पण त्यासाठी तुम्हांला सोनी मराठी वाहिनीवर दररोज सोम. ते शुक्र. रात्री 9.30 वा. 'खरंच तिचं काय चुकलं?' ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 


संबंधित बातम्या


Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; अभिनेत्रीने सुरू केला स्वत:चा व्यवसाय