Ravikant Tupkar on Bogus Seeds : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. खरीप हंगाम सुरु झाला असून, अनेक कृषी केंद्र चालक हे रासायनिक खतांच्या बाबतीत लिंकिंग करत असल्याच्या घटना राज्यभर उघडकीस येत आहेत. तसेच अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे सुद्धा विकलं जात असल्याचे समोर आलं आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृषी खात आणि बियाणं कंपन्यांचं साटलोट असल्याचा आरोप करत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी (17 जून) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी बुलढाण्यात शेतकरी मोर्चाच आयोजन करण्यात आल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे.


सध्या अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे विकलं जात आहे. असे प्रकार हे कृषी अधिकारी आणि कृषी केंद्र चालकाच्या संगनमताने सुरु असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. जर असे प्रकार उघडकीस आले तर कृषी केंद्र चालकासह संबंधित कृषी अधिकाऱ्याला कपडे काढून मारु असा इशाराच रविकांत तुपकर यांनी दिला आहे. यासंबंधी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी मोर्चाच आयोजन केलं आहे. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले असल्याचे तुपकरांनी सांगितले.




कृषीमंत्री, तुमच्या राज्यात नेमकं काय सुरु?


राज्यात खरीप हंगाम सुरु झाला असून, अनेक कृषी केंद्र चालक हे रासायनिक खतांच्या बाबतीत लिंकिंग करत असल्याच्या घटना राज्यभर उघडकीस येत आहेत. अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे विकले जात आहे. मुळ किंमतीपेक्षा जास्त दरानं खतांची विक्री होत आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे आपण संवेदनशील मंत्री आहेत असे आम्ही समजतो, पण तुमच्या राज्यात नेमकं काय सुरु आहे, असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना कोणते खत घ्यावे, कोणते बी पेरायचे याचा शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. तो आमचा पिडीजात धंदा असल्याचे तुपकर म्हणाले.  


बोगस बियाणं मार्केटमध्ये नेमकं येत कसं?


काही कृषी केंद्र चालकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून कृत्रीम खतांचा तुटवडा केला जातो. यामध्ये कृषी विभाग सहभागी असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. बोगस बियाणे मार्केटमध्ये नेमकं येत कसं? असा सवालही यावेळी तुपकर यांनी उपस्थित केला. तुमच्याकडे कारवाईसाठी यंत्रणा आहे, कर्मचारी आहेत, अधिकारी आहे, ती यंत्रणा कारवाई का करत नाही? असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला. ही यंत्रणा कारवाई करत नसले तर कृषी विभाग, कृषी केंद्र चालक आणि कंपन्यांचे साटलोट असल्याचा आरोप यावेळी तुपकरांनी केला.  मूळ किंमतीपेक्षा जास्त दरानं खत आणि बियाणांची विक्री कोणी केली तर त्या कृषी केंद्र चालकांना फटके दिल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचे तुपकर म्हणाले.   


महत्वाच्या बातम्या:


Sangli Crime News : इस्लामपुरात सोयाबीनचं बोगस बियाणं विकणाऱ्या गोदामावर छापा; 23 लाख 50 हजाराचं बियाणं जप्त


Agriculture News : ऑनलाईन बोलावलेली खतं, बियाणं आणि कीटकनाशक जप्त, यवतमाळमध्ये कृषी विभागाची कारवाई