Andhra Pradesh Mango : मागील दोन वर्षापासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही पूर्णपणे कोरोनाचा धोका टळलेला नाही. या कोरोनाच्या संकटाचा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. उद्योग, व्यापार, शेतकरी, शेतमजुर यांचं मोठ नुकसान या काळात झालं आहे. सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकताना ज्या अडचणी येत होत्या, त्या काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. सध्या बाजारात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या मागणीत 60 टक्के वाढ झाल्याची माहिती आंध्र प्रदेशमधील वियवाडा येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षी आंबा उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना खूप मोठा फटका बसला होता. आता मात्र, कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे स्थिती पूर्वपदावर येत आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आंब्याच्या मागणीत 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विजयावाडामझील व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच आम्ही राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंब्याची निर्यात पुन्हा सुरु केली आहे. त्याचा आम्हाला फायदा होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
महााष्ट्रातील बाजारपेठांमध्ये देखील आंबा दाखल झाला आहे. मात्र, काही ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील कोकणात मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या बागा आहेत. मात्र, त्याठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे काढणीला आलेला आंबा खाली पडून नुकसान झाले आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील आंबा पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अशातच राज्यात आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून हवामानत देखील बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडं तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळीचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: