Dairy Business : तुम्हाला कमी पैशात व्यवसाय सुरु करुन चांगला नफा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या व्यवसायातून तुम्‍हाला भरपूर कमाई करता येणार आहे. पण त्यासाठी तुम्‍हाला कठोर परिश्रमही करावं लागणार आहे. भारतात करोडो रुपयांचा दुग्ध व्यवसाय आहे. तुम्हालाही हा व्यवसाय करता येऊ शकतो. विशेष म्हणजे गायी-म्हशी न पाळताही तुम्ही दुग्ध व्यवसाय करु शकता. डेअरी व्यवसायाच्या (Dairy Business) माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 


दूध व्यवसायात तुम्हाला अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. ज्यामध्ये तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करु शकता. तसेच गायी आणि म्हशींचे पालन करुन त्यामाध्यमातून दुधाच्या विक्रीतून  चांगला नफा मिळवू शकता. पण जर तुम्हाला गायी आणि म्हशी पाळायच्या नसतील आणि दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी अजूनही संधी आहे. ती म्हणजे तुम्ही दूध संकलन केंद्र सुरु करु शकता.


गावांतील पशुपालकांकडून दूध खरेदी


दूध कंपनी प्रथम विविध गावांतील पशुपालकांकडून दूध खरेदी करते. हे दूध वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा करून कंपन्यांच्या प्लांटपर्यंत पोहोचते आणि तिथे त्यावर प्रक्रिया केली जाते. ज्यामध्ये प्रथम गावपातळीवर दूध संकलित केले जाते आणि नंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या शहरात किंवा प्लांटमध्ये पाठवले जाते. अशा स्थितीत तुम्ही दूध संकलन सुरु करु शकता. या संकलन केंद्र गावातून दूध गोळा करते आणि नंतर ते प्लांटला पाठवते. अनेक ठिकाणी लोक स्वत: दूध देण्यासाठी येतात, तर अनेक संकलन केंद्रे स्वत: पशुपालकांकडून दूध गोळा करतात. अशा स्थितीत तुम्हाला दुधाची फॅट तपासावी लागेल, ते वेगळ्या डब्यात साठवावे लागेल आणि नंतर दूध कंपनीकडे पाठवावे लागेल.


अशी सुरुवात करा


दूध संकलन केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज लागणार नाही. सर्वप्रथम तुम्ही दूध कंपनीशी करार करा. त्यानंतर तुम्हाला पशुपालकांकडून दूध गोळा करुन कंपनीकडे पाठवावे लागते. हे काम सहकारी संघाकडून केले जाते. दरम्यान, काही लोक एकत्र येऊन समिती स्थापन करुन गावात दूध संकलन केंद्र सुरू करा. त्यासाठी कंपनीकडून पैसेही दिले जातात.


अशा प्रकारे दर ठरवले जातात


दुधाचे दर हे त्यातील फॅट आणि एसएनएफच्या आधारे ठरवले जातात. सहकारी संघात दुधाची किंमत ही 6.5 टक्के फॅट आणि 9.5 टक्के एसएनएफने ठरवली जाते. यानंतर जसजसे फॅटचे प्रमाण कमी होते तसतशी किंमतही कमी होते.


दूध आणि त्याच्या उत्पादनांना मोठी मागणी 


डेअरी फार्मिंग व्यावसाय हा लोकांसाठी एक संपन्न बाजार म्हणून उदयास येत आहे. डेअरी फार्मचे संचालन हे व्यापक प्रयत्न, लक्षणीय वेळ आणि उपयुक्त संसाधनांचे एकत्रीकरण आहे.  हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुसर्‍या व्यवसायापेक्षा या व्यवसायामध्ये सुरवातीला कमी गुंतवणूक लागती. दूध आणि त्याच्या उत्पादनांची मागणी कधीही कमी होणार नाही कारण शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही दुधाची गरज लागते.  आपल्याला उत्पादनांच्या मार्केटिंगची काळजी करण्याची गरज नाही कारण हा एक पारंपारिक व्यवसाय आहे म्हणून आपण उत्पादने सहज विकू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या:


Milk Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; आजपासून दुधाच्या दरांत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ