Anil Bonde on State Government : महाविकास आघाडी सरकार अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. मोर्शी तालुक्यातील 2019 व जानेवारी 2020 मधील 4 हजार 500 शेतकऱ्यांचे 4.52 कोटी रुपयांचे गारपीटचे अनुदान अद्यापही वाटप करण्यात आले नाही. अनेकवेळा निवेदने दिले, विनंती केल्या पण, अजून पर्यंत अनुदान दिले नाही. जर येत्या 15 दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांना दिले नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'जागो सरकार' आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी दिला आहे.


अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राज्य सरकार जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला. 4 हजार 500 शेतकऱ्यांचे 4.52 कोटी रुपयांचे गारपीटचे अनुदान अद्याप मिळाले नाही. वेळोवेळी अर्ज केले, विनंत्या केल्या, तरीही याकडे राज्य सरकारने लक्ष दिले नाही. अशातच मोर्शी विधानसभेचे आमदार याकडे बघायला तयार नसल्याचे बोंडे म्हणाले. यावेळी बोंडे यांनी मोर्शीचे आमदार देवंद्र भुयार यांच्यावरही निशाणा लगावला. भुयार यांचे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नसल्याचा आरोप बोंडे यांनी केला. तसेच पिंपळखुटे मोठामधील 1 हजार 156 शेतकरी, लेहगाव जे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघात येते, तेथील 906 शेतकरी, दहसूर येथील 1 हजार 549 आदिवासी शेतकरी  शेतकरी, उदखेड 997 शेतकरी अशा 4 हजार 500 शेतकऱ्यांचे 4.52 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले नाही. यामध्ये अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चुका केला, त्यांच्यावरही कोणतीही कारनाआ केली नसल्याचे बोंडे यावेळी म्हणाले. वारंवार मागणी करुनही अनुदान मिळाले नाही. येत्या 15 दिवसात अनुदान मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन जागो सरकार आंदोलन करणार असल्याचा इशारा बोंडे यांनी दिला.    


हे महाविकास आघाडीचे सरकार झोपले आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे बोंडे म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे 4 कोटी 50 लाख रुपये मिळाले पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे बोंडे यांनी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या: