Agriculture News : राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेती पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचं संकट कमी होतं तर आता उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.  तर दुसरीकडे उन्हाचा पारा वाढल्याने उष्णतेची लाट आली आहे. याचाच परिणाम आता फळबागांवर होताना दिसून येतोय आणि याच वाढत्या उन्हामुळे  फळबागांनी देखील माना टाकायला सुरुवात केली आहे..


बीडमधील शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली असून शेकऱ्यांना आता पुन्हा चिंता लागून राहीली आहे.  गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील  गोवर्धन शिंदे यांच्या दोन एकरवरील पपई बागेची परिस्थिती सध्या अवस्था वाईट आहे. अवकाळी पावसातून ही बाग वाचली जरी असली तरी या बागेवर आता वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवत आहे. अगोदरच अवकाळी पावसामुळे फळबागांच प्रचंड नुकसान झालं आहे.  तर दुसरीकडे आता उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि याचाच परिणाम फळबागांवर होताना दिसतोय. त्यामुळे या वातावरण बदलांचा परिणाम फळबागांवरही होत असल्याचं पहायला मिळत आहे. 


गणेश शिंदे यांच्या तीन एकर जमिनीवर मुबलक पाणीसाठा असल्याने यावर्षी मोसंबीचा बहार धरला होता.  मात्र अचानक उन्हाची तीव्रता वाढू लागली. त्यामुळे विहिरीतलं पाणी आटू लागलं. लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या या भागात वाढत्या उष्णतेमुळे परिणाम होण्याचा  धोका निर्माण झाला आहे..वाढत्या उष्णतेमुळे रेशीम कोष तयार करणाऱ्या रेशीम आळीवर देखील परिणाम होऊ लागला आहे.  रेशीम कोष तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर लावावे लागत आहेत.. नाहीतर त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


यावर्षी अचानक वातावरणामध्ये होणारा बदलाचा मोठा परिणाम सध्या फळबाग पिकांवर होताना पाहायला मिळत असल्याचं कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले. अवकाळी पाऊस यापूर्वी फेब्रुवारी मार्चमध्ये पडायचा आता मात्र एप्रिलमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे फळबागाचे मोठे नुकसान होत आहे. 


राज्यामध्ये एकीकडे अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने तलावातल्या पाण्याची पातळी कमी झाली. विहिरी देखील कोरड्या पडू लागल्या आहेत.  त्यामुळे याचा परिणाम आता फळबागांवर जाणवू लागला आहे.  तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवसंकट उभा राहिल आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 


Marathwada: मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?