Success Story : निलगिरीचे नाव ऐकताच सगळ्यांच्या मनात येतो तो म्हणजे चहा. लोकांना असे वाटते की दार्जिलिंग, आसाम आणि हिमाचल प्रदेशनंतर (Himachal Pradesh) निलगिरीमध्ये सर्वाधिक चहा पिकवला जातो. परंतु तसे नाही आता येथील शेतकरीही सफरचंदाची लागवड करु लागले आहेत. तामिळनाडूच्या (tamilnadu) निलगिरीमधील कोटगिरी येथील कुक्कल गावातील शेतकऱ्यांच्या गटाने सफरचंद पिकवण्यात यश मिळवले आहे. एका वर्षानंतर सफरचंदाचे उत्पादन सुरू होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


कुक्कल गावातील शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वी सफरचंदाची लागवड केली


टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, कुक्कल गावातील शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वी सफरचंदाची लागवड सुरू केली होती. शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन आता इतर गावातील शेतकरीही सफरचंद शेती सुरु करण्याचा विचार करत आहेत. 'नॉलेज शेअरिंग अँड केअरिंग' या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या बॅनरखाली, सुमारे 120 शेतकऱ्यांनी काश्मीरमधून 2000 सफरचंदांची रोपे आणली होती. प्रायोगिक तत्त्वावर उंच ठिकाणी त्यांची लागवड केली. यामध्ये शेतकऱ्यांना यश मिळाले. सुमारे 99 टक्के झाडे सुरक्षित आहेत. लवकरच या झाडांना फळे लागण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत, यशाने प्रोत्साहित होऊन येथील शेतकरी आता डोंगराळ भागातील सर्व बडगा गावात सफरचंद लागवड सुरू करण्याचा विचार करत आहेत.


वर्षभरात एका झाडातून किमान 100 किलो फळे मिळणार


एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या शेतातील किमान 99 टक्के झाडे जिवंत आहेत. हे आमच्यासाठी मोठे यश आहे. त्यांच्या मते सफरचंद लागवडीनंतर चार वर्षांनी उत्पादन सुरू होईल. सफरचंदाचे झाड एका वर्षात किमान 100 किलो फळे देते. एक एकरमध्ये सफरचंदाची लागवड करणारा शेतकरी एका वर्षात किमान 8 लाख रुपये कमवू शकतो. 


पूर्वी निलगिरी प्रदेशातील शेतकरी संत्र्यासह विविध प्रकारच्या पिकांची शेती करत होते. पण हळूहळू इथले शेतकरी पारंपारिक शेतीपासून दुरावले गेले. आता मोठ्या प्रमामात शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. आमच्याकडे हिमाचलमधील शेतकरी देखील आहेत जे लोकांना सफरचंद लागवडीची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी प्रशिक्षण देतात. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बडगा गावात सफरचंद लागवड सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या:


बायकोला हवी होती शुद्ध हवा, नवरा झाला 'ऑक्सिजन मॅन; 70 वर्षीय बंगाली बाबाची अनोखी कहानी