Ahmednagar success story: आजकाल शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत कमी क्षेत्रात वेगळे प्रयोग करताना दिसतात. काही जण ड्रॅगन फ्रुट लावतात तर अनेकांना फळ पिकांची भुरळ पडते. पण अहमदनगरच्या एका शेतकऱ्याने उसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मातीत केवळ अडीच एकरावर आल्याचा मळा फुलवत लाखोंचं उत्पन्न मिळवले आहे. मागच्या वर्षीही या शेतकऱ्याने एकरभर क्षेत्रातून 108 क्विंटल आल्याचे उत्पन्न काढत 10 लाखांचं उत्पन्न मिळवलं होतं. आता आलं काढणीला आलं असून शेतकऱ्याला किमान 14 ते 15 लाख रुपये निश्चित नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. (Ginger farming)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सोनई या गावचे संग्राम येळवंडे यांनी पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत सव्वादोन एकरामध्ये आल्याची लागवड केली व हा प्रयोग यशस्वी केलाय. कमीत कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवत आल्यातून लाखोंची कमाई करणारा या शेतकऱ्याचं परिसरात कौतुक होत आहे.(Agriculture success story)
दीडशे क्विंटल आल्याची अपेक्षा
आज त्यांचे हे अडीच एकरातील आले काढणीला आले असून एकरी 130 ते 150 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्याला आहे. सध्या बाजारात आल्याची आवक चांगली असल्यानं भाव घसरले आहेत. तरीही येत्या काळात आल्यातून एकरी 14 ते 15 लाखांचे उत्पन्न संग्राम येळवंडे यांना अपेक्षित आहे. मागच्या वर्षी एका एकरात आल्याची लागवड या शेतकऱ्याला फायद्याची ठरली शेतावरच नऊ हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता .त्यातून दहा लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले होते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा क्षेत्र वाढवत अडीच एकरात आल्याची लागवड या शेतकऱ्याने केली.
कशी केली आल्याची शेती?
सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचनाच्या सहाय्याने एकरी 9 ते 10 क्विंटल बियाणे यावर्षी या शेतकऱ्याने वापरले व आल्याची लागवड केली.यावर्षी लागवडी पूर्वी त्यांनी शेतामध्ये बेड तयार केले व बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा वापर करत आल्याची लागवड केली. आल्या सोबतच ते कांदा, ऊस व फळबागांमध्ये आंबा या पिकांची देखील ते शेती करतात. संग्राम येळवंडे यांना त्यांचा पेशाने इंजिनियर असणारा भाऊ धनंजय येळवंडे यांची देखील मोलाची मदत होते. पारंपरिक शेतीला फाटा देत आल्यासारख्या पिकाचा यशस्वी प्रयोग करत या शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्हा सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाव काढलय