Success story: भारत हा उत्सवांचा देश आहे. आणि उत्सव, सणवार म्हटलं की फुलांची सजावट आलीच. देशात देवाच्या आरतीसाठी हजारोंच्या संख्येनं फुलं वाहिली जातात. आपल्या प्रत्येक समारंभात या फुलांच केवढं महत्त्वय! पण भारत फुलशेतीत अग्रेसर जरी असला तरी खराब झालेली, सुकलेली फुलं शेवटी टाकूनच द्यावी लागतात. मग असे किती पैसे मिळणार फुलशेतीतून? पण, हाच समज दूर करत एका उद्योजकानं खराब झालेल्या, सुकलेल्या फुलांपासून व्यवसाय करण्याचं ठरवलं. आणि सोलार ड्रायरचा वापर करत दरमहिन्याला हा उद्योजक बसल्याबसल्या ४ लाख रुपये कमवतो.
सौरऊर्जेचा वापर करून शिवराज निषाद या तरुण उद्योजकानं फुलांची नासाडी होण्यापासून मार्ग काढला आहे. उत्तरप्रदेशातल्या या तरुणानं महिलांसह अनेकांना रोजगार दिलाय. सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रायरने वाया जाणारी, सुकलेली फुलं वाळवत त्यानं अनेक फार्मास्युटीकल कंपन्यांना विकली. तसेच चहाचा मसाला करणाऱ्या कंपन्या तसेच औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना विकत दर महा ४ लाखांची कमाई केली आहे. सामान्य नोकरदाराचे वर्षाचे पॅकेज हा उद्योजक महिनाभरात कमवतो.
नक्की काय केलं या उद्योजकानं?
भारतात सणासुदीला फुलशेतीची चंगळ असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण सण संपला की न विकली गेलेली फुलं शेवटी टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. उत्तरप्रदेशातील शेतकरी फुलांचं उत्पादन विक्रीसाठी नेता येऊ शकत नाही हे लक्षात आलं की गंगेवर फेकून देतात. यामुळं नदीत होणारा कचरा या उद्योजकानं पाहिला. या फुलांना सुकवून याचा आयुर्वेदिक आणि हर्बल उद्योगात मोठी मागणी असल्याचं या तरुणाला कळलं. आणि सुरु झाला सोलार ड्रायरपासून फुलांना सुकवण्याचा हा व्यवसाय.
आपल्या प्रदेशातील फुलांचा असा केला फायदा
उत्तरप्रदेशात येणाऱ्या फुलांचा नक्की कशासाठी वापर होऊ शकतो हे या उद्योजकानं शोधून काढलं. जसे की, गोकर्णाच्या फुलांचा हर्बल चहासाठी होणारा वापर आणि त्याची मागणी लक्षात घेता ही फुले कशी वापरता येतील याचा विचार करत ही फुले वाळवण्याचा निर्णय घेतला. वृद्धत्वविरोधी, मधुमेहविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुण आहेत, हा निषादचा पहिला महत्त्वपूर्ण शोध होता. त्याच्या उत्पादनाची श्रेणी विस्तृत करण्यासाठी, त्याने चहा, सिरप आणि संरक्षित करण्यासाठी वापरण्यासाठी हिबिस्कस आणि कॅमोमाइलसह इतर फुले सुकवण्यास सुरुवात केली.
सोलार ड्रायने फुलांची गुणवत्ता टिकून राहते..
कृषी जागरणला दिलेल्या मुलाखतीत या उद्योजकानं सांगितलं, सौर ड्रायर धूळ आत जाऊ देत नाही. त्यात सुकणारे उत्पादन हे फूड-ग्रेड आणि 100% शुद्ध आहे,” निषाद स्पष्ट करतात. 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान स्थिर ठेवून गुणवत्तेचा त्याग न करता फुलांचा मूळ रंग आणि सुगंध कायम ठेवण्याची खात्री ड्रायरने केली.
शेकडो स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार
सध्या निषादचा फुलांचा व्यवसाय ५०० ते १००० किलो फुलांची विक्री करतो. ज्यामुळे महिन्याकाठी या उद्योजकाला १ लाख ते ४ लाख रुपये मिळतात. या व्यवसायाने शेकडो शेतकऱ्यांना रोजगार देण्यात आला आहे.