Wheat Cultivation : सध्या देशभरात थंडीचा जोर (Cold Weather) वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, वाढती थंडी काही पिकांसाठी फयाद्याची ठरत आहे. तर काही पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे. वाढती थंडी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) फायद्याची ठरत आहे. त्यामुळं गहू (Wheat) उत्पादक शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडं थंडीमुळं बटाटे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच उशिरा पेरणी केलेल्या मोहरीच्या (Mustard) पिकासाठी देखील ही थंडी नुकसानकारक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.
सध्याची वाढत्या थंडीची परिस्थिती गव्हाच्या पिकासाठी अनुकूल आहे. येत्या आठवडाभरातही हीच स्थिती कायम राहिल्यास यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी माहिती गहू उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या मोहरी हे पीक चांगले आहे. मात्र, तापमानात आणखी घट झाल्यास पिकावर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं पिकाच्या नुकसानीची शक्यता आहे. गतवर्षी दोन्ही पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. परंतु आतापर्यंत दोन्ही पिकांसाठी हवामान अनुकूल असल्याने यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
सध्याचे हवामान गव्हाच्या पिकासाठी अनुकूल आहे. हे वनस्पतिवृद्धीसाठी उपयुक्त असे हवामान असल्याची माहिती हरियाणातील अंबालाचे उपसंचालक (कृषी) डॉ. गिरीश नागपाल यांनी दिली. शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाला अंतराने पाणी द्यावे, अशी माहिती डॉ. गिरीश नागपाल यांनी दिली. परंतु ज्यांनी मोहरीची उशिरा पेरणी केली आहे. त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक असल्याचे नागपाल म्हणाले.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी
देशात थंडीचा जोर वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. याचा मानवी जीवनावर देखील परिणाम होताना दिसत आहे. थंडीचा जोर वाढला असतानाच देशाची राजधानी दिल्लीत पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्री जोरदाव रवाऱ्यासह दिल्लीत पाऊस झाल्यामुळं थंडीचा जोर वाढला आहे. आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे. ही वाढती थंडी महाराष्ट्रात हरभरा, तूर, केळी पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे. काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: