Success story: देशातील अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतात सातत्यानं नवनवीन प्रयोग करत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. या कृषी क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील काम करत आहेत. महिलाही शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील महिला शेतकरी रुबी पारीक यांच्या 15 वर्षांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी एक यशस्वी सेंद्रिय शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. रुबी यांची कथा संघर्षमय आहे. 


रुबी पारीक यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कौशल्यामुळं शेतीच्या प्रयोगशाळेत स्वत:ला आर्थिकदृष्ट्या बळकट केले आहे. समाजात त्यांनी नवी ओळख निर्माण केली. भारतातील ग्रामीण महिलांना देशाची खरी नोकरदार महिला म्हटले जाते. शेवटी, यात तथ्य आहे कारण देशातील ग्रामीण स्त्री ग्रामीण पुरुषापेक्षा जवळपास दुप्पट शेतीची कामे करते. याशिवाय त्यांना घरची कामेही करावी लागतात. असे असूनही त्यांना कधीही शेतीचे श्रेय दिले जात नाही. पण हा गैरसमज मोडून काढत राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील रुबी पारीक या महिला शेतकऱ्याने 15 वर्षांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर एक यशस्वी सेंद्रिय शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. रुबीची कथा संघर्षांनी भरलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कौशल्यामुळ त्यांनी शेतीच्या प्रयोगशाळेत स्वत:ला आर्थिकदृष्ट्या बळकट करुन समाजात स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. 


आर्थिक संकटामुळं दहावीपर्यंतच शिक्षण 


रुबी पारीकच्या संघर्षाची कहाणी तिच्या जन्माच्या एका वर्षानंतरच सुरू होते. कारण तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. वडिलांच्या आजारपणामुळं बरीच जमीन आणि मालमत्ता विकली गेली. मग तिच्या आईने पाच भावंडांना लहानपणी कठीण काळात वाढवले. या आर्थिक संकटामुळं रुबीला दहावीपर्यंत शिक्षण घेता आले. 2004 मध्ये, दौसा जिल्ह्यातील खटवा गावातील रहिवासी ओम प्रकाश पारीक यांच्याशी तिचा विवाह झाला. तिच्या सासरच्या घरात शेती हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. त्यामुळं हळूहळू तिने शेतीच्या कामातही मदत करायला सुरुवात केली आणि शेतीचे ज्ञान मिळाल्यानंतर ती शेतीत मोठी भूमिका बजावू लागली. या कामात पतीने तिला अधिक साथ दिली.


भविष्य धोक्यात पाहून नवा मार्ग स्वीकारला


रुबीने आपली शेती सुधारण्यासाठी शेतीशी संबंधित बैठकांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, 2008 साली कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ रुबीच्या गावात आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणासाठी बोलावले. यामध्ये सहभागी होऊन रुबीने सेंद्रिय शेतीबद्दल बरेच काही शिकले आणि समजून घेतले. तेथे त्यांनी रसायने, खते, कीटकनाशके यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम व रोगांची माहिती भरली. रासायनिक शेतीमुळे आपले भविष्य कसे धोक्यात आले आहे, असा विचार त्यांनी केला. यानंतर रुबीने आपल्या पतीशी चर्चा केली आणि मोठे धाडस दाखवत सेंद्रिय शेतीत नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. तिने ठरवले की ती केवळ सेंद्रिय शेतीचा अवलंब करणार नाही, तर तिच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरित करेल.


रसायनमुक्त शेतीचा बिगुल वाजला


2008 साली रुबी पारीक यांनी तिच्या शेतात सेंद्रिय शेती सुरू केली. आज बाजरी, गहू, हरभरा, गवार, भुईमूग, बार्ली ही सर्व प्रकारची पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली आहेत. यातून त्यांना अधिक फायदा होत आहे. वास्तविक, रुबीने सुरुवातीला फक्त काही भाज्याच सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या. त्यासाठी केव्हीकेमध्ये खत आणि काही सेंद्रिय कीटकनाशके बनवायला शिकल्या होत्या. मग त्यांनी स्वतःच्या शेतात वापरण्यासाठी सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीटकनाशके बनवायला सुरुवात केली. याशिवाय केव्हीकेने आपल्या गावात शेतकरी क्लबही स्थापन केला. ज्याचा उद्देश हा होता की गावातील शेतकऱ्यांनी एकत्र बसून सेंद्रिय शेतीशी संबंधित समस्यांवर चर्चा करुन चर्चा करावी. एकमेकांना मदत करावी. सेंद्रिय शेतीत रुबीच्या सक्रिय कार्यामुळं तिला फार्मर्स क्लबचे अध्यक्ष बनवण्यात आले.


सेंद्रिय खत युनिट कारखान्यापेक्षा कमी नाही


रुबीने तिच्या पतीसह तिच्या गावात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 200 मेट्रिक टन कंपोस्ट युनिट सुरु केले आहे. गांडूळ खत तयार करण्याबरोबरच येथे गांडूळ संगोपनही केले जाते. रुबीच्या या युनिटमुळे संपूर्ण दौसामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट उपलब्ध होते. रुबी सांगतात की, हे युनिट सुरू करण्यामागे तिची शेती पूर्णपणे सेंद्रिय बनवणे तसेच तिच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशी जोडणे हा होता. वर्मी कंपोस्ट युनिट व्यतिरिक्त, रुबीने अझोला उत्पादन युनिट स्थापन केले आहे. 


मेहनत आली फळाला 


रुबीच्या प्रेरणेने अनेक शेतकऱ्यांनी दौसामध्ये सेंद्रिय शेती सुरु केली आहे. जेव्हा रुबीच्या परिसरात सेंद्रिय पिकांचे चांगले उत्पादन होऊ लागले, तेव्हा त्यांनी शेतकरी उत्पादक संघटना स्थापन केली. आज सुमारे 1000 सेंद्रिय शेतकरी या संस्थेशी जोडले गेले आहेत. या संस्थेचा कारभारही रुबी अतिशय चोखपणे सांभाळत आहेत. या शेतकऱ्यांपैकी 400 हून अधिक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवत आहेत. सध्या शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक उलाढाल 50 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार 'या' योजनेचा लाभ