Flower Farming : जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो असे म्हणतात. प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील (Punjab) एका शेतकऱ्याच्या (Farmers) बाबतीत घडला आहे. पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील संधवान गावात राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने फुल शेतीचा  (Flower Farming) यशस्वी प्रयोग केलाय. मनजिंदर सिंग असं सा शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने पारंपारीक गहू आणि भात पिकाची शेती न करता फुलशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या फुल शेतीतून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. विशेष म्हणजे ते इंग्लंडहून परत आले आहेत.  


कमी खर्च, नफा अधिक


मनजिंदर सिंग यांनी कोलकाता आणि मध्य प्रदेशातून फुलांच्या बिया विकत घेतल्या. त्यानंतर फरीदकोटमध्येच आपल्या 6 एकर जमिनीत फुलशेती केली आहे. आता तो दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. भात आणि गव्हापेक्षा कितीतरी जास्त पैसे फुलशेतीतून मिळत आहेत. फुलशेतीमुळे या शेतकऱ्याचे जीवन सुगंधाने भरले आहे. या शेतकऱ्याला पाहून आजूबाजूचे इतर शेतकरीही गहू आणि भात शेतीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. खुद्द कृषी विभागच या शेतकऱ्याच्या शेतीचे उदाहरण इतर शेतकऱ्यांना देत आहे. या शेतीचा मोठा फायदा होत आहे.  कारण या शेतकऱ्यानं फुलांची लागवड केली तर त्याचे अनेक फायदे आहेत. कमी खर्च, दैनंदिन उत्पन्न, इतर पिकांच्या तिप्पट नफा, पाण्याची बचत आणि पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम नाही.


इंग्लंडहून येऊन गावी करतायेत फुलशेती 


मनजिंदर सिंग यांनी सांगितले की, काही काळापूर्वी तो इंग्लंडहून आपल्या गावी परतले होते. आता त्यांचे फुलशेतीतील यश पाहून कृषी विभागाचे अधिकारीही त्यांचे कौतुक करत आहेत. या शेतकऱ्याचे उदाहरण ते इतर शेतकऱ्यांना देत आहेत. कृषी विभागातील आत्मा प्रकल्पाचे संचालक डॉ.अमनदीप केशव म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना गहू आणि धान पिकांव्यतिरिक्त इतर शेती करण्यास प्रोत्साहित करतो. या अंतर्गत फुलांची लागवड करणे हा देखील चांगला पर्याय आहे. कारण या शेतीत खर्च कमी आणि नफा जास्त. मनजिंदर सिंग यांनी  इतर शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. 


फुलांची लागवड फायदेशीर 


मनजिंदरचे फुलांचे पीक आणि त्यातून होणारा नफा पाहून इतर अनेक गावांतील शेतकरी भात आणि गव्हाऐवजी फुलांची लागवड करण्याचा विचार करत आहेत. सिंह यांनी सांगितले की, पूर्वी ते भाजीपाला पिकवायचे. ज्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. रात्री उठून पाणी द्यायचे आणि पहाटे भाजीपाला बाजारात घेऊन जावे लागत होते. खूप मेहनत होती. पण फायदा काही झाला नाही. पण फुलशेतीमध्ये मेहनत कमी आणि नफा जास्त. फुलांची मागणी वर्षभर राहते. त्यामुळे त्याची किंमत कधीच कमी होत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो.


महत्त्वाच्या बातम्या:


एक पेरु दीड किलोचा, जंबो पेरुची किंमत एकूण व्हाल थक्क; तरुण शेतकरी करतोय लाखोंची कमाई