Success Story : सध्या शेतकऱ्यांना (Farmers) विविध संकटंचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. मात्र, अनेक तरुण शेतकरी विविध संकटांचा करत शेतीत चांगले प्रयोग करत आहेत. शेतकरी शेती क्षेत्रात उच्च शिक्षण आणि आधुनिकतेची कास धरत तरुणाईकडून शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जात आहे. विशेषत: तरुणांनी केलेल्या या प्रयोगांना यशही मिळत आहे. याचेच एक उत्तम उदाहरण नागपूर शहरातीला (Nagpur) अक्षय आणि दिव्या होले यांना घालून दिले आहे. या तरुण दाम्पत्याने आपल्याच राहत्या घरात केवळ चार बाय चारच्या एका बंद खोलीत चक्क केशरची शेती फुलवली आहे. यासाठी आधुनिक अश्या एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
केवळ चार बाय चारच्या खोलीत फुलवली केशरची बाग
अक्षय आणि दिव्या होले यांनी या यशस्वी प्रयोगातून केवळ तीन महिन्यातच अर्धा किलो केशरचं उत्पादन घेतल असून पुढील पाच महिन्यात दीड ते दोन किलो केशराचे उत्पादन अपेक्षित आहे.
केशर ( Saffron ) हे नाव जरी उच्चारलं तर आपल्या डोळ्यापुढे काश्मीर उभं राहतं. मात्र आता यांच केशरचे उत्पादन नागपूरसारख्या शहरात ( Nagpur News ) देखील घेणे शक्य झाले आहे.असा यशस्वी प्रयोग नागपुरतील अक्षय आणि दिव्या होले यांना केला आहे. दिव्या ही पेश्याने एका बँकेत कार्यरत आहे तर अक्षयचा स्वतःचा व्यवसाय आहे. या दोघांचीही पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करावा असा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांची कायम धडपड देखील होती. अशातच त्यांना कमी जागेत उत्तम व्यवसाय होऊ शकेल अशा केशर शेती बद्दल माहिती मिळाली. या माहितीच्या शोधात असतांना अक्षय आणि दिव्याने थेट कश्मीर येथील पंपोरा हे गाव देखील गाठले.परिपूर्ण माहिती गोळा करून घरी परतल्यानंतर या दोघांनी आपल्या राहत्या घरातील केवळ चार बाय चारच्या बंद खोलीत केशरची बाग फुलवून हा यशस्वी प्रयोग राबवला आहे.
उष्ण वातावरणावर तंत्रज्ञानाच्या मदतीने केली मात
शेतीसाठी कायम पोषक असे वातावरण महत्वाचे असते. तसे नसल्यानं शेतातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अथवा अपेक्षित उत्पादन होऊ शकत नाही. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीसाठी लागणारे पोषक वातावरण निर्माण केले जाऊ शकते. केशर शेतीचे उत्पादन प्रामुख्याने उत्तर भारतातल्या थंड हवेच्या ठिकाणी होत असतं. कारण केशरच्या उत्पादनासाठी फार थंड हवामान लागत असतं. मात्र आता आधुनिक अश्या एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन नागपूरसारख्या उष्ण शहरात देखील केशरचे पीक घेणे शक्य झाले आहे.
काय आहे एरोपोनिक्स तंत्रज्ञान?
पारंपरिक शेतीला आता आधुनिकतेची जोड देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. गेल्या काही काळात नावारुपास आलेल्या एरोपोनिक्स (Aeroponics Technology)
या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अशक्य वाटणारे पीक देखील सहज घेणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रण करुन शेती केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग होत नाही. शिवाय यामध्ये कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये यशस्वी प्रयोग राबवून अगदी लाखोंचे उत्पादन मिळवणे सहज शक्य झाले असल्याने या तंत्रज्ञानाला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असे म्हणतात.
एकदा गुंतवणूक नंतर नफाच नफा!
दरवर्षी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केशरची मागणी होत असते.देशात होणाऱ्या मागणीच्या तुलनेत केवळ 20 टक्केच उत्पादन आपल्या देशात होत असतं व उर्वरित मागणीची पूर्तता बाहेरच्या देशातून होत असते. देशात केशरची मोठी बाजापेठ असून यातून लाखोंचे नफा मिळवणे सहज शक्य आहे. सुरुवातीला कांद्याच्या रोपाप्रमाणे दिसणारे केसरच्या बियाणांची लागवड केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्ष त्यापासून अनेक रोप तयार केले जाऊ शकतात.केशरच्या बियाणांची एकदा लागवड केल्यानंतर पुढील पाच महिने त्यांची योग्य ती काळजी घेणे फार महत्त्वाची असते. सुरुवातीच्या काळात एकदाच मोठी गुंतवणूक केल्या नंतर या शेतीच्या उत्पादनातून केवळ नफाच हाती येत असतो.
महत्त्वाच्या बातम्या:
Success story: महिलेची संघर्षगाथा! आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल