Agriculture News : एका शेतकऱ्यानं तब्बल 12 वर्षांनंतर चप्पल घातली आहे. मनोहर शंकर असे या शेतकऱ्याचे नाव असून ते तेलंगणा राज्यातील शेतकरी आहेत. हळद मंडळ स्थापन होईपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर शेतकरी मनोहर शंकर यांनी चप्पल घातली आहे.
तेलंगणातील शेतकरी मनोहर शंकर यांनी 4 नोव्हेंबर 2011 रोजी हळद मंडळ स्थापन होईपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पवित्रा घेतला होता. अखेर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर आता मनोहर शंकर यांनी चप्पल घातली आहे.
मनोहर शंकर यांच्याकडे जमीन नाही
मनोहर शंकर हे 12 वर्षांपासून चप्पलाशिवाय फिरत होते. कधीतरी कोणीतरी हळद उत्पादक शेतकर्यांच्या मदतीला येईल आणि त्यांच्या हिताची चर्चा करेल, अशी त्यांना आशा होती. अकेर त्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शंकर यांच्याकडे शेतीसाठी जमीन नाही. व्यवसायातील नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमीन विकली आहे.
मनोहर शंकर यांनी शेतकर्यांच्या सल्ल्याचे पालन करण्यास नकार दिला आहे. मनोहर शंकर रेड्डी यांनी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी 63 दिवसांच्या पदयात्रेनंतर 11 आठवड्यांच्या दीक्षा प्रवासाला निघाले. यानंतर आरमर आणि बालकोंडा मतदारसंघात पदयात्रा काढण्यात आली. अशा प्रकारे त्यांना 'पसुपू मनोहर रेड्डी' हे टोपणनाव मिळाले. यावेळी ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी शंकर रेड्डी यांना नवस सोडून चप्पल घालण्याचा सल्ला दिला. मात्र, मनोहर शंकर यांनी शेतकऱ्यांचा सल्ला मानण्यास नकार दिला. आता पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर मनोहर यांनी 12 वर्षांनंतर चप्पल घालण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: