Agriculture News : सध्या देशात मोठ्या प्रमाणावर सरकारकडून धान्याची खरेदी (Purchase of Grain) सुरु आहे. विविध राज्यात तांदळासह (Rice) गव्हाची (Wheat) खरेदी केली जात आहे. यावर्षी उत्पादनातही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यातही सध्या तांदळाची खरेदी सुरु आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करताना दिसत आहे. दरम्यान, ओडिशा सरकारनं (Odisha Govt) शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. नेमका काय निर्णय घेतला त्याची माहिती पाहुयात...


शेतकऱ्यांसाठी नेमका काय निर्णय घेतला?


विविध राज्यात सरकारकडून तांदळाची खरेदी सुरु आहे. शेतकऱ्याना दिलासा देण्यासाठी सरकारच्या वतीनं विविध उपायोजना कल्या जात आहेत. अशातच ओडीशा सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ओडीशा सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण देण्यासाठी कॅन्टीन सुरु केलं आहे.   ओडिशामध्ये शेतकरी बाजार समितीत तांदूळ विकण्यासाठी खूप अंतरावरुन येतात. अनेकवेळा त्यांच्या जेवणाची गैरसोय होते. कधीकधी जेवणासाठी शेतकऱ्यांकडे पैसेही नसतात. अशा शेतकऱ्यांना ओडीशा सरकारं मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. तांदूळ खरेदी केंद्राजवळ शेतकऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांना मोफत जेवण मिळणार आहे. 


राज्यातील गजपती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. गजपतीशिवाय परळखेमुंडी, काशीनगर, उपलडा, गरबांध इथेही कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. गजपती जिल्ह्याचे दंडाधिकारी लिंगराज पांडा यांनी सांगितले की, परिसरातील महिला स्वयं-सहायता गट परळखेमुंडी नियंत्रित बाजार समिती (RMC) द्वारे चालवल्या जाणार्‍या मोफत कॅन्टीनमध्ये जेवण तयार करतात. हे जेवण शेतकऱ्यांना मोफत दिले जाते. शेतकऱ्यांना दुपारी मोफत जेवण मिळते. 


गजपती  जिल्ह्यात 15 कॅन्टीन उघडण्याची योजना


तांदूळ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना जेवणासोबतचच थंड पाणी आणि इतर सुविधाही बाजार समितीकडून पुरवल्या जात आहेत. परंतू सध्या अशी अनेक तांदूळ खरेदी केंद्रे आहेत जिथे शेतकऱ्यांना अशा सुविधा उपलब्ध नाहीत. आता या खरेदी केंद्रांवरही मोफत कॅन्टीन सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. गजपती  जिल्ह्यात सुमारे 15 कॅन्टीन सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कॅन्टीनवर सतत लक्ष ठेवले जात आहे. दररोज सुमारे 20 शेतकरी कॅन्टीनमध्ये मोफत जेवण घेत आहेत. कॅन्टीन चालवण्याचा खर्च बाजार समितीला दिला जातो. शेतकऱ्यांना दिलेल्या अन्नाच्या बदल्यात महिला बचत गटांना प्रति शेतकरी 60 रुपये दिले जातात. 


महत्त्वाच्या बातम्या:


Red Ladyfinger : आता हिरव्या बरोबर 'लाल भेंडी'ची शेती, ग्राहकांची मोठी मागणी; वाचा या भेंडीत काय वेगळेपण?