Agriculture News : सध्या शेतकरी पारंपारिक पिकांच्या ऐवजी आधुनिक पद्धतीनं नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. अशाच एका राजस्थानमधील नागौरच्या खिनवसार परिसरातील शेतकऱ्यानं प्रयोगशील शेती केली आहे. या शेतकऱ्याने वालुकामय असलेल्या जमिनीत तैवानच्या गुलाबी पेरुंची लागवड केली आहे. 


खिनवसार परिसर हा वालुकामय परिसर आहे. येथे शेती करणे हे अवघड काम आहे. या ठिकाणी विविध प्रकारची माती आढळते. शेतकरी कठोर परिश्रम करून अनेक प्रकारची पिकं करत आहे. फुले, फळे विविध वनस्पतींची लागवड करत आहेत. येथील शेतकरी लिखमाराम मेघवाल यांनी त्यांच्या शेतात तैवानच्य गुलाबी पेरुची बाग फुलवली आहे. शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्वी ज्या ठिकाणी शेती करणं कठीण होते त्या ठिकाणी आता शेती केली जात आहे. वाळवंटात आंब्याचे पीक वाढू लागले आहे. ओसाड जमिनीवर भाजीपाला पिकत आहे. राजस्थानच्या नागौरमध्येही असंच काहीसं घडतंय. येथील शेतकरी लिहमाराम मेघवाल यांनी त्यांच्या शेतात तैवानी गुलाबी पेरूचे पीक घेतले आहे.


 एका रोपाची किंमत 140 रुपये


शेतकरी लिहमाराम मेघवाल यांनी तैवानच्या गुलाबी पेरुची  2020 मध्ये लागवड केली होती. राजस्थानच्या नागौरचा खिनवसार परिसर हा वालुकामय क्षेत्र आहे. येथे शेती करणे हे अवघड काम आहे. मात्र, शेतकरी कठोर परिश्रम करून अनेक प्रकारची पिके, फुले, फळे पिकवतात. लिहमाराम यांनी लखनौहून तैवान गुलाबी पेरुचे रोपे विकत आणली होती. तेथील एका रोपाची किंमत 140 रुपये होती. 2020 मध्ये त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करुन झाडे लावली. यासोबतच या झाडांना गांडुळापासून बनवलेले खत म्हणजेच गांडूळ कंपोस्ट खतही दिले. त्याचबरोबर कृषी तज्ज्ञांचेही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या देखरेखीखाली ही झाडे वाढली आणि फळे आली.


लॉकडाऊनमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मिळवली माहिती


शेतकरी लिहमाराम मेघवाल यांनी सांगितले की, एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर ते 5 बाय 6 नुसार ठेवण्यात आले आहे. यामुळं झाडे वाढली की एकमेकांना भिडत नाहीत. गतवर्षी या पेरू पिकातून त्यांनी प्रति रोप 3 किलो उत्पादन घेतले होते. यावर्षी प्रति रोप 10 किलो उत्पादन होईल असा अंदाज आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तैवान गुलाबी पेरूच्या लागवडीची माहिती मिळाली होती. त्यांनी पेरुच्या जातीच्या लागवडीची सर्व माहिती मिळवली. सर्वप्रथम त्यांनी 200 रोपे लावली. त्यापैकी 150 रोपे जगली. त्याच वेळी 50 झाडे खराब झाली. या 150 झाडांपासून पहिले उत्पादन प्रति रोप 3 किलो पेरु झाले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : पारंपारिक पिकांना फाटा, तीन एकर क्षेत्रावर नारळ शेती; मजुरमुक्त शेतीचा प्रयोग