हिंगोली : महाराष्ट्रतील शेतकरी आता आधुनिक शेती बरोबरच करार शेतीला सुद्धा महत्त्व देऊ लागला आहे या माध्यमातून अनेक शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन घेतले  आहे.


हिंगोलीच्या आसेगाव येथील  शेतकरी मुरलीधर भालेराव यांनी अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या एका कंपनीशी करार केला.  पापरीका या औषधी प्रजातीचे मिरचीच्या उत्पन्न घ्यायचं ठरवलं या कंपनीशी करार करत असताना या मिरचीच्या उत्पादनाची खरेदी करण्याची जबाब कंपनीकडे असते.  मिरचीच्या दर्जानुसार ग्रेड ए आणि ग्रेड बी अशा दोन प्रकारच्या मिरच्यांचे प्रकार ठरवले जातात. त्यानुसार 27 ते 30 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कंपनी मिरचीची खरेदी केली जाते त्यानुसार आसेगाव येथील शेतकऱ्यांनी या औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीची लागवड केली. अगदी साध्या पद्धतीने लागवड केलेल्या या मिरचीचे यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीचे उत्पादन निघू शकतं हे शेतकरी सांगत आहेत. 


पारंपारिक पीक पद्धत आणि बाजारात न मिळणाऱ्या भावाला कंटाळून मुरलीधर भालेराव यांनी ही करार शेती करत 30 गुंठे शेती मध्ये औषधी मिरचीची लागवड केली आहे.  चार महिन्याच्या मेहनतीतून आणि तीस हजार रुपयांच्या खर्चामधून त्यांना पाच क्विंटल मिरचीचे उत्पादन निघणार आहे, आता या मिरचीची तोडणी सुरू आहे.  या मिरच्यांची तोडणी केल्यानंतर उन्हामध्ये या मिरच्या वाळवल्या जातात आणि त्यानंतर या मिरच्यांची खरेदी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन या मिरचीची खरेदी करतात.


तीस गुंठे शेतात तब्बल एक लाख रुपयांचा नफा 


 शेतकरी मुरलीधर भालेराव यांना यावर्षी होत असलेला पाच क्विंटल च्या मिरची मधून जवळपास एक लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळानार आहे खर्च आणि मेहनत वजा करता तीस गुंठे शेतामध्ये शेतकरी भालेराव यांना तब्बल एक लाख रुपयांचा नफा होत आहे असे शेतकरी भालेराव सांगत आहेत 


पारंपारिक पिकांना अनेक शेतकरी कंटाळले आहेत त्याचबरोबर शेतामध्ये उत्पादन घेतल्यानंतर बाजारामध्ये शेतमालाचे भाव घसरतात त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु या करार शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव अगोदरच कळत असल्यामुळे कोणते उत्पादन घ्यायचे याचा निर्णय शेतकऱ्याला घेता येतो. विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असलेल्या या पापरीका मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी या मिरचीची लागवड केली आहे.


गावातील शेतकरी मुंजाजी काळे यांनी अमेरिकेतील कंपनीशी करार करत तब्बल दोन एकर शेतामध्ये या मिरचीची लागवड केली आहे. चार महिन्यापूर्वी लागवड केलेल्या या मिरच्या आता काढणीस आले आहेत. मिरची काढण्याची प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यात असून शेतकरी मुंजाजी काळे यांना एकरी चार लाखाचा फायदा होतो. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या या मिरचीमधून शेतकरी मुंजाजी काळे यांना आठ ते नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार आहे. तर आर्थिक फायदा बरोबरच आपल्या मिरचीला अमेरिकेत सुद्धा मागणी आहे. याचा सुद्धा वेगळाच अभिमान असल्याचं शेतकरी काळे सांगत आहेत