Kisan Sabha : केंद्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांकडून (Farmers) दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कांद्याची खरेदी नाफेडकडून सुरु आहे. मात्र, कांद्याची खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेक अटी घातल्या आहेत. यावरुन किसान सभेचे (Kisan Sabha) नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी टीका केलीय. कांदा खरेदीसाठी नाफेडच्या 12 अटी म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे नवलेंनी म्हटलंय.
12 अटीमधून पास झालेला कांदाच नाफेड खरेदी करणार
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारुन कांद्याचे दर पाडले आहेत. त्यातून मोठा उद्रेक निर्माण झाला. हा उद्रेक थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेडकडून दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. आता नाफेडद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्यासाठी अटी शर्थी लागू करण्यात आल्याचे अजित नवले म्हणाले. 12 अटीमधून पास झालेला कांदाच नाफेड खरेदी करणार आहे. नाफेडने घातलेल्या अटी म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. या अटी शर्थी पाहून भीक नको पण कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ आल्याचे अजित नवले म्हणाले.
शेतकरी पूर्ण करु न शकणाऱ्या अटी
दरम्यान, चार महिने साठवलेला चाळीतला कांदा या 12 अटी शर्थी पास करेल अस कोणाला वाटत असेल तो शोधूनही कोणाला सापडणार नसल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले. शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रीक टन कांदा असताना केवळ दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याची भूमिका सरकारनं घेतला आहे. तो कांदा खरेदी करतानाही पूर्ण करु न शकणाऱ्या 12 अटी शर्थी लावल्या असल्याचे अजित नवले म्हणाले.
कांदा खरेदीसाठी टाकलेल्या अटी आणि शर्ती काय आहेत?.
प्रतिहेक्टर 280 क्विंटलपेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही.
दर्जेदार 45 मिलिमीटरच्या पुढचा चांगला कांदा चालेल.
गुणवत्ता नसलेला कांदा घेणार नाही.
विळा, पत्ती लागलेला
काजळी असलेला
रंग गेलेला
बुरशीजन्य
आकार बिघडलेला
कोंब फुटलेला
बुरशीजन्य
वास येणारा
मऊ कांदा घेणार नाही
या सर्व अटी शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्यासाठी लावण्यात आल्या आहेत. शेतकरी या सर्व अटी कितपत पूर्ण करु शकतील हा प्रश्नचिन्ह आहे. नाफेडला अपेक्षित असलेला गुणवत्तेचा कांदा शेतकऱ्यांकडे आहे का? असा प्रश्न आहे. जर असेल तर शेतकरी नाफेडला ऐवढ्या कमी किंमतीला कांदा का विकेल. ते शेतकरी योग्य भाव येण्याची वाट पाहतील. कांदा काढणीनंतर साठवण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे साध्या चाळीत जसा कांदा टिकेल तसा टिकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून चालू असतो.
महत्त्वाच्या बातम्या: