Agriculture News : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे या संस्थांदरम्यान कृषी क्षेत्राशी संबधित प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार (Agriculture sector Memorandum of Understanding) करण्यात आला आहे. या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Ashok Kakade) आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने डॉ. भास्कर पाटील (Dr. Bhaskar Patil) यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
कृषी क्षेत्राशी संबधित प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजातील व्यक्तींना होणार आहे. सारथीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेस या संदर्भात काम सुरु करण्याचे आदेश दिला आहे. सुरुवातीला एकूण दहा प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
'या' प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश
फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाअंतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेडनेट हाऊस तंत्रज्ञान, रोपांची अभिवृद्धी व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, पीकनिहाय अभ्यासक्रम-गुलाब, जरबेरा, कार्नेशन, पीकनिहाय अभ्यासक्रम -रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो, काकडी तर फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणाअंतर्गत लॅन्डस्केपिंग व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान, फ्लॉवर अरेंजमेंट/ड्राय फ्लॉवर आणि प्लॅन्ट पार्ट्स आणि काढणी पश्चात प्रशिक्षणाअंतर्गत भाजीपाला व फळ पिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन, पुरवठा साखळी व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था यांच्यात झालेला सामंजस्य करार हा तीन वर्षांचा असणार आहे. यासाठी उमेदवारांची पात्रता तसेच अटी व कागदपत्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. या अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन सुविधा लवकरच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोणाला होणार 'या' प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ
या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजातील व्यक्तींना होणार आहे. सारथीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेस या संदर्भात काम करण्याचा आदेश दिला आहे. सुरुवातीच्या काळात एकूण दहा प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Purandar Figs: अतिवृष्टीवर मात! पुरंदर दिवेतील झेंडे यांच्या अंजिराला मिळतोय 90 रुपये डझन दर