India vs Bangladesh : भारतीय संघ (Team India) बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाला. बांगलादेशने भारताचा एक गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने शिखर धवनसह सर्व संघाला खस टिप्स दिल्या. त्याने धवनसोबत नेटमध्ये स्वीप आणि रिव्हर्स स्वीपबद्दल चर्चा केली. यादरम्यान शिखर धवन आणि द्रविडसोबत श्रेयस अय्यरही दिसला. या सर्व प्रशिक्षणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.


याशिवाय टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक इतर खेळाडूंसोबत प्रॅक्टीस करताना दिसला. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर अखेरच्या क्षणी उमरान मलिकला संघाचा भाग बनवण्यात आलं. त्यामुळे पहिल्या सामन्यात संधी न मिळालेल्या उमरान मलिकचा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात उमरान मलिकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यास शार्दुल ठाकूर किंवा कुलदीप सेनला बाहेर बसावे लागू शकते.


पाहा VIDEO-






कधी, कुठे होणार सामना?


हा भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कसे आहेत दोन्ही संघ?


भारत: 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.



बांगलादेश:


लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.





हे देखील वाचा-