Agriculture news : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला गिफ्ट दिलं आहे. सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा पिकांच्या आधारभूत किंमतीत 2 ते टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न 


शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या संदर्भात सरकारनं वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले आहेत. त्यानुसार, सरकारनं अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये देखील वाढ केली आहे. सरकारनं सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. 


 






'या' सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ


सरकारने एकूण 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बार्ली, गहू, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश होतो. गव्हाच्या आधारभूत किंमतीत 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेलबिया आणि मोहरीच्या MSP मध्ये 200 रुपये प्रति क्विंटल, मसूर 425 रुपये प्रति क्विंटल, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपयांची वाढ आणि सूर्यफुलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं या वाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 


2024-25 च्या हंगामात कोणत्या रब्बी पिकाला किती किंमत?


गहू - प्रति क्विंटल 2 हजार 275 रुपये एमएसपी मंजूर 
बार्ली - प्रति क्विंटल 1 हजार 850 रुपये MSP मंजूर
हरभरा 5 हजार 440 रुपये प्रति क्विंटल एमएसपी मंजूर
मसूर -  प्रति क्विंटल 6 हजार 425 रुपये MSP मंजूर
मोहरी - प्रति क्विंटल 5 हजार 650 रुपये MSP मंजूर
सूर्यफूल- प्रति क्विंटल 5 हजार 800 रुपये MSP मंजूर


एमएसपी म्हणजे काय?


शेतकऱ्यांच्या हितासाठी एमएसपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला MSP म्हणतात. या प्रणालीचा फायदा असा आहे की पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरी केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.


एमएसपीमध्ये 23 पिकांचा समावेश 


केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत ठरवते. 23 पिकांचा एमएसपीमध्ये समावेश आहे, 7 तृणधान्ये, 5 कडधान्ये, 7 तेलबिया आणि 4 नगदी पिके. अशा रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते. त्याच वेळी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये कापणी केली जाते.


एमएसपीमध्ये या पिकांचा समावेश


तृणधान्ये- गहू, भात, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि जो
कडधान्ये- हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद,
तेलबिया- मोहरी, सोयाबीन, तीळ, करडई, भुईमूग, सूर्यफूल, नायजर बियाणे
रोख- ऊस, कापूस, कोपरा आणि कच्चा ताग


महत्त्वाच्या बातम्या:


MSP: दिवाळीपूर्वीच मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, गव्हासह 'या' पिकांच्या MSP मध्ये होणार वाढ