PM Modi Reaction on Gaza Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गाझामधील रुग्णालयावरील हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गाझा येथील रुग्णालयावर एअरस्ट्राईक (Gaza Hospital Airstrike) करण्यात आला आहे. या हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्णालय युद्धाच्या काळात नागरिकांचं आश्रय स्थान बनल्येन हल्ल्यातील मृतांची संख्या जास्त आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गाझाच्या हॉस्पिटलवरील एअरस्ट्राईकचा निषेध करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


गाझामध्ये हॉस्पिटलवरील हल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया


पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर एक्स पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'गाझा येथील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती मिळाली आणि मनाला धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबीयांना आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सध्या सुरू असलेल्या संघर्षात होणारी नागरिकांची जीवितहानी ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडू नका.'


पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक






गाझा रुग्णालयातील एअरस्ट्राईकमध्ये 500 ठार


गाझाच्या अल-अहली अरब रुग्णालयावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझाने हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदाल धरलं आहे. या हल्ल्यासाठी हमास आणि इस्रायलने एकमेकांवर आरोप केले आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कस्ताननेही इस्रायलवर गाझा शहरातील अल-अहली अरब रुग्णालयात बॉम्बफेक केल्याचा आरोप केला आहे. हॉस्पिटलवरील हल्ल्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला जबाबदार धरलं आहे. 


इस्रायल-पॅलेस्टाईनचे एकमेकांवर आरोप


गाझा शहरातील अल-अहली अरब रुग्णालयात मंगळवारी हवाई हल्ला करण्यात आला. हा हल्ला इस्रायली लष्कराने केल्याचा दावा हमासने दोष दिला. यानंतर इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळून लावले आहे. याशिवाय इस्रायलने इस्लामिक जिहाद गट हमासकडून चुकीच्या रॉकेट प्रक्षेपणामुळे हा स्फोट झाल्याचं म्हटलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel Gaza Attack : अ‍ॅपल वॉचच्या मदतीने शोधला मुलीचा मृतदेह, वडीलांनी सांगितला काळीज पिळवटून टाकणारा अनुभव