Raju Shetti : गेल्या सहा महिन्यापासून मी चीनी कृत्रिम फुलावर (Chinese plastic flowers) बंदी घालावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव (Minister Bhupender Yadav) यांच्याकडे करत आहे. पण केंद्र सरकार याबाबत उदासिनता दाखवित असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केले. मेक इन इंडियाच्या जयघोषात चीनी फुलांनी केलेल्या शिरकावामुळं फूल उत्पादक शेतकऱ्यांवरही आता आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागल्याचे शेट्टी म्हणाले.


राजू शेट्टींनी फूल उत्पादकांची व्हिडीओ केला शेअर 


लॅाकडाऊन आणि चीनी कृत्रिम फुलांच्या शिरकावामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले. केंद्र सरकारने चीनी कृत्रिम फुलावर बंदी घालावी अशी मागमी मी करत आहे, मात्र सरकार याकडं लक्ष देत नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेट्टींनी फेसबूकवर फुल उत्पादक शेतकऱ्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फुल उत्पादक शेतकरी दर घसरल्यामुळं रस्त्यावर फुले फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथील आहे. फुलांना भाव मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून आपला संताप व्यक्त केला. गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.  


 फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात 


चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर (Chinese plastic flowers)बंदी घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली होती. या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुतोवाच केले होते. कोरोना लॅाकडाऊन संकटानंतर देशाच्या बाजारपेठेत स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फुल उत्पादकांचा चीनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीने व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे चायनीज प्लास्टिक फुले वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, असे शेट्टींनी निवेदनात मागणी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : चायनीज प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घाला, राजू शेट्टी यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी