Agriculture News : सध्या राज्यातील पपई उत्पादक शेतकरी (Papaya Farmers) संकटात आहे. कारण पपईच्या दरात घसरण झाली आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दर नसल्यामुळं काही शेतकरी पपईच्या बागा काढून टाकत आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मंलाजन गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात असणाऱ्या दीड एकर क्षेत्रावरील पपईची बागेवर रोटावेटर फिरवला आहे.
अनेक ठिकाणी पपईवर रोगाचा प्रादुर्भाव
पपईला सध्या योग्य तो बाजार भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्याला उभ्या पपईच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आल आहे. लाखोंचा खर्च करुन बाजार भाव कवडीमोल मिळत असल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्याने दीड एकर पपईवर रोटावेटर फिरवला आहे. दुष्काळी परिस्थितीतही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पपई बागा जगवल्या आहेत., पावसानं दिलेली हुलकावणी, त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस, यामुळं पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत सापडला आहे. पपईवर पडलेल्या या रोगामुळे आता पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय.