PPF: आज देशात PPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातेधारकांची संख्या सातत्याने वाढत आहे. PPF च्या करमुक्त आणि उत्तम व्याज प्रणालीमुळं लोकांमध्ये ती खास बनली आहे. गुंतवणूक करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी हा एक चांगला पर्याय आहे. 


कोण उघडू शकते पीपीएफ खाते


कोणत्याही व्यक्ती पीपीएफ खाते उघडता येते. हे खाते उघडण्यासाठी वयाची कोणताही अट नाही. एवढेच नाही तर ज्यांचे ईपीएफ खाते आहे तेही हे खाते उघडू शकतात. PPF ही 15 वर्षांची योजना आहे, जी आणखी 5 वर्ष वाढवता येते. हे खाते पोस्ट ऑफिस आणि बँकेत उघडता येते.


वर्षातून जास्तीत जास्त 12 वेळा रक्कम जमा करु शकता


या खात्यात तुम्ही वर्षातून जास्तीत जास्त 12 वेळा रक्कम जमा करु शकता. संपूर्ण महिन्याचे व्याज मिळवण्यासाठी तुम्हाला महिन्याच्या 5 तारखेपूर्वी रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी रक्कमही जमा करू शकता. या योजनेतून कर्ज घेणे आणि अंशतः काढणे असाही नियम आहे.


ठेवींवर व्याज


PPF रिटर्न्सवरील व्याजदर सरकार दर तिमाहीत सरकारी सिक्युरिटीजच्या परताव्याच्या आधारे ठरवते. पीपीएफने 1968-69 मध्ये प्रतिवर्षी 4 टक्के व्याज दिले होतो. त्याचवेळी, 1986-2000 पर्यंत 12 टक्के व्याज देऊ केले. सध्या, डिसेंबर 2023 तिमाहीत 2023-24 साठी PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के  व्याज देत आहे.


PPF खात्यात जमा करण्याची मर्यादा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाते सक्रिय ठेवण्यासाठी किमान वार्षिक रक्कम 500 रुपये असणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात जमा करता येणारी कमाल रक्कम 1.5 लाख रुपये आहे. 


अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरही खाते


अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरही तुम्ही खाते उघडू शकता. आई किंवा वडील दोघेही अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतात.


एका व्यक्तीच्या नावावर एकच खाते


एखादी व्यक्तीच्या नावावर एकच खाते उघडता येते. जर एखाद्या व्यक्तीने चुकून त्याच्या नावावर दोन खाती उघडली तर दुसरे खाते अनियमित मानले जाते.


नावनोंदणी


PPF अर्जामध्ये (फॉर्म-ए) नामांकनाची तरतूद नाही. कारण तो वेगळा फॉर्म भरावा लागतो.


पीपीएफ खाते मुदतपूर्व बंद


पीपीएफ खाते वेळेपूर्वी बंद करण्याचाही नियम आहे. खात्याची 5 आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतरच याची परवानगी दिली जाते. याशिवाय आणखी एक प्रसंग आहे. खातेदार, पती/पत्नी किंवा मुले यांच्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे दाखवल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करता येते.


महत्त्वाच्या बातम्या:


Investment Tips : एक कप चहाच्या किंमतीपेक्षा कमी दरातील बचत, दरमहा मिळेल 5 हजार रुपये