Black Wheat : सध्या रब्बीची पेरणी जवळ आली आहे. मुख्य पीक असलेल्या गव्हाच्या (Wheat) पेरणीलाही काही दिवसांतच सुरुवात होईल. काही ठिकाणी पेरणीला सुरुवात देखील झाली आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक गव्हाचे पीक पेरत आहेत. तर काही शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करताना दिसत आहेत. अनेक शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग देखील करत आहेत. यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
देशातील अनेक भागात काळ्या गव्हाची लागवड केली जाते. या गव्हाच्या लागवडीतून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काळ्या गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय हा वाण बाजारात 7000 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जातो. आता आपण त्याच्या लागवडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काळा गहू आरोग्यासाठी उत्तम
काळ्या गव्हाचा भावही सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त आहे. काळ्या गव्हामध्ये सामान्य गव्हापेक्षा ६० टक्के जास्त लोह असते. गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो. या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
30 नोव्हेंबरपर्यंत काळ्या गव्हाची लागवड करावी
काळ्या गव्हाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. त्याची पेरणी 30 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सरीवर गव्हाची लागवड केली जात असेल तर प्रति एकर 40 ते 50 किलो बियाणे आवश्यक आहे. पेरणीनंतर चांगल्या पिकासाठी चार ते पाच पाणी द्यावी. पेरणीनंतर 3 आठवड्यांनी पहिले पाणी द्यावे. यानंतर कळ्या फुटण्याच्या वेळी दाणे पिकण्याच्या वेळी पाणी द्यावे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या गव्हाच्या झाडांचे दाणे जेव्हा पिकलेले आणि कडक होतात आणि दाण्यांमध्ये 20 ते 25 टक्के ओलावा शिल्लक राहतो, तेव्हा त्याची काढणी करावी.
बाजारात काळ्या गव्हाचा भाव किती?
काळ्या गव्हाची लागवड करून शेतकरी भरघोस नफा मिळवू शकतात. बाजारात त्याची किंमतही सामान्य गव्हापेक्षा जास्त आहे. काळ्या गव्हाला बाजारात 8000 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. एक क्विंटल काळ्या गव्हाची किंमत सामान्य गव्हाच्या दुप्पट आहे. यानुसार सामान्य गव्हाच्या तुलनेत शेतकऱ्यांना काळ्या गव्हातून बंपर नफा मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या: