Agriculture News : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हाहाकार (Heavy Rain) घातला आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं (Agriculture crop) नुकसान झालं आहे. तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये मात्र जून महिला संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी उगवून आलेलं सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नव संकट उभा राहिलं आहे. 


बीड तालुक्यातल्या राजुरी गावच्या अशोक सुरवसे यांच्या दोन एकर कापसाच्या शेतीत असा  गोगलगायचा सडा पडला आहे. तर उगवूण आलेलं पीक मोठं होण्याच्या आतच गोगलगाय फस्त करून टाकत आहेत. त्यामुळं दररोज सकाळी शेतकऱ्यांना शेतामध्ये अशा गोगलगाय वेचून काढाव्या लागत आहेत. तर गेल्या वर्षी देखील याच गोगलगायीमुळं त्यांचं दोन हेक्टरवरील गाजराचे पीक पूर्णपणे वाया गेलं होतं. सुनील सुरवसे यांनी गेल्या वर्षी दोन एकरावर सोयाबीन पेरल होतं. त्यावर गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचं संपूर्ण नुकसान झाल्यानं यावर्षी त्यांनी कापसाची लागवड केली. मात्, यावर्षी देखील कापसावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्यानं एक एकरावरील कापसाची त्यांनी दुबार लागवड केली असून, त्यावर देखील गोगलगायचा प्रादुर्भाव होत असल्यानं याचा परिणाम कापसाच्या उत्पन्नावर होणार आहे. 


दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यात एकही मोठा पाऊस नाही


बीड जिल्ह्यामध्ये बीडसह केज, परळी आणि माजलगाव या परिसरात सोयाबीनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. तर दुसरीकडं गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने रिमझिम पडत असलेल्या पावसानं गोगलगायसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. अगोदरच बीड जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणी केल्यानंतर उगवून आलेल्या पिकावर असा गोगलगायचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकऱ्यांसमोर एक नवसंकट उभा राहिल आहे.


कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा 


राज्यामध्ये सध्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. त्यातच गोगलगायमुळं शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. परळी तालुक्यातील काही शेतांची त्यांनी पाहणी करुन तात्काळ गोगलगायने प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसरीकडे पावसाने दिलेल्या उसंतीनं आणि गोगलगायचा प्रादुर्भावामुळं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळं शेतीला मोठा फटका बसत आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव होणे हे शेतीसाठी काही नवीन नाही. मात्र, मागच्या वर्षीपासून अचानक उद्भवलेल्या गोगलगायमुळं शेतकरी मात्र हैराण झाले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराल? वाचा कृषी विभागाचा सल्ला