Cotton News : यावर्षीच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कापसाला 7 हजार 53 रुपयांचा दर मिळाला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. मात्र, कापसाचा उत्पादन खर्च पाहता हा दर 10 हजार रुपयांचा मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ
यंदा कापसाच्या शुभारंभ प्रसंगी नव्या कापसाला 7 हजार 53 रुपयांच्या भाव मिळाला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. मात्र, कापसाचा उत्पादन खर्च पाहता हा दर 10 हजार रुपये मिळायला हवा होता अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथील श्री जी कापूस जिनिंग येथे दरवर्षी कापूस खरेदीचा मुहूर्त असतो. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुहूर्ताच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरवर्षी शुभारंभ प्रसंगी नेहमीच चढ्या दरानं कापूस खरेदी केली जात असते. मात्र यंदा कापसाला कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
कापूस उत्पादनाचा खर्च पाहता सध्या कापसाला कमी दर
मागील वर्षीचा कापूस अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे. नवीन कापसाबाबत अद्यापही देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेचे चित्र स्पष्ट झाले नाही. कापूस खरेदीदारांनी अतिशय सावध पवित्रा घेत नव्या कापसाला शुभ मुहूर्तावर 7 हजार 53 इतका दर दिला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर दिला आहे. नव्या कापसामध्ये आद्रता जास्त असल्यानं हे दर कमी असल्याचं खरेदीदार सांगत आहेत. मात्र कापूस उत्पादन खर्च पाहता किमान दहा हजार रुपयांच्यावर हे दर असायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज जरी कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आसपास असले तरी आगामी काळात देशात आणि विदेशात झालेलं उत्पादन याचा विचार करता कापूस दरात चढ उतार होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मागील वर्षी कापसाला 15 हजार रुपयांचा दर
मागील वर्षी कापसाला 15 हजार रुपयापर्यंतचा भाव मिळाला होता. त्यामुळं यंदाही कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. भावातील चढउतारामुळं शेतकरी कापसाचे भाव वाढेल या अपेक्षेत होते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला देखील सामोरं जाव लागत आहे. तर दुसरीकडं यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. काही ठिकाणी खरीपाची पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसाचा यंदा कापूस पिकाला देखील चांगलाच फटरा बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Cotton Price : अखेर शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळालेच नाही, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात