Agriculture Latest News : राज्यातील सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रात आहे. मात्र या कॉटन बेल्टमध्ये दरवर्षी कापसावर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्रीय कापूस  संशोधन संस्थेने नंदुरबार जिल्ह्यात बोंड अळी नियंत्रण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. हा प्रयोग यशस्वी होत असून यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  


कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येत असून कापूस उत्पादक शेतकरी नेहमी अडचणीत सापडत असतो आणि टाकलेला खर्च देखील मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांच्या मार्फत कापसावर होणारे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिल जात आहे.  कापूस संशोधन केंद्र नागपूर यांच्यामार्फत क्रॉसिलू-4 जेल देण्यात आला असून याच्या प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिला जात आहे. नंदुरबार तालुक्यातील जून मोहिदा या गावात कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत हे प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. कापसावर बोंडअळी थांबवण्यासाठी या जेलच्या उपयोग करून प्रत्येक झाडामध्ये सहा इंचाच्या अंतर ठेवून सव्वाशे ग्राम हे लावायचं असून तीन वेळेस याच्या उपयोग करायच्या आहे. बागायती कापूस असेल तर त्या ठिकाणी चार वेळेस या जेलच्या वापर करायचा आहे. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांची पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे. तर कापूस देखील चांगल्या प्रतीचा येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र प्रा.पद्माकर कुंदे यांनी दिली आहे.


क्रॉसिलू-4 जेल मुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. पीक जगवण्यासाठी अनेक प्रकारचे फवारणी करावा लागत होती मात्र या नवीन उपक्रमामुळे फवारणी मजुरी आणि वेळ वाचणार असून त्यासोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्ना त चांगल्या प्रमाणात वाढ होणार आहे. जुन्या मोहिदा गावातील प्रल्हाद पाटील या शेतकऱ्यांनी दोनदा या जेलच्या वापर केला गेला, असून आज तिसऱ्यांदा कापसाच्या पिकावर वापर करण्यात आला असून कापूस पिकाची परिस्थिती उत्तम असून शासनाने या जेलच्या वापर करावा यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फायदा होणार आहे.


सरकारने आणि शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र या क्रॉसिली व जेल मूळ आतापर्यंत या शेतकऱ्याच्या फायदा झाला असून शासनाने उपक्रम अमला त आणला तर कापसावर होणारे गुलाबी बोंड अळी रोखण्यास यशस्वी होऊ शकतो.