Wheat Cultivation : देशात यंदा गव्हाचे उत्पादन (Wheat Production) मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. यंदा गव्हाची कमतरता भासणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी सुरु आहे. सध्या देशात रब्बी हंगामातील (Rabi season) पिकांची पेरणी सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात पिकांच्या  पेरणी होत आहे. गव्हाच्या लागवडीत (Wheat Cultivation) देखील वाढ झाली आहे. यंदा 286 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, देशातील दोन राज्यात गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे. तर आठ राज्यात गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे.


कोणत्या राज्यात गव्हाची लागवड वाढली तर कुठे कमी झाली?


गव्हाच्या लागवडीच्या संदर्भात केंद्र सरकारनं माहिती दिली आहे. यंदा देशात गव्हाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, दोन राज्यात गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार  पेरणीची स्थिती पाहिली तर महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये यंदा गव्हाच्या लागवडीत घट झालीआहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकमध्ये गव्हाच्या पेरणी वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. यंदा देशात गव्हाखालील लागवडीच्या क्षेत्रीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षी गहू लागवडीचे क्षेत्र हे 286.5 लाख हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी यावेळेपर्यंत हे क्षेत्र 278.25 लाख हेक्टर होते. 


रब्बी पिकांच्या लागवडीत मोठी वाढ


केंद्र सरकारकडून देशातील गव्हाच्या लागवडी संदर्भातील माहिती सातत्यानं दिली जात आहे. यंदा गव्हाच्या पेरणीची स्थिती चांगली आहे. आतापासूनच केंद्राकडून साठेबाजीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीत देखील मोठी वाढ झाली आहे. पिकांखालील एकूण क्षेत्राची स्थिती पाहिल्यास 552.28 लाख हेक्टरवरून रब्बी पिकांचे क्षेत्र हे 578.10 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.


मागील वर्षी उष्णतेचा गव्हाला बसला होता फटका


केंद्र सरकार गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2021-22 मध्ये गव्हाचे देशांतर्गत उत्पादन घटले होते. उत्पादन कमी होण्यामागील मुख्य कारण म्हणजे वाढती उष्णता हे होते.  उष्णतेच्या लाटेमुळं गव्हाचं पीक अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती. यंदा मात्र, मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Wheat Buffer Stock : एकीकडं गव्हाचा विक्रमी साठा, तर दुसरीकडं डाळींचा तुटवडा; वाचा काय आहे नेमकी स्थिती?