Agriculture News : यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव वाढून त्याचे दुष्परिणाम पाऊसमानावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्थितीत कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. काळजीपुर्वक नियोजन केल्यास अधिकचे कापूस उत्पादन घेणं शक्य असल्याची माहिती कापूस क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. याबाबत जैन उद्योग समूहाचे कापूस तज्ज्ञ बाळकृष्ण जडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावं
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी 20 मे पासून पाऊसपूर्व हंगामी कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतजमीनीची नांगरणी, वखरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यंदा हवामान खात्याच्या अंदाजनुसार एल निनोचा प्रभाव वाढून त्याचे दुष्परिणाम म्हणून पाऊस कमी किंवा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जैन उद्योग समूहाचे कापूस तज्ज्ञ बाळकृष्ण जडे यांच्या मते एल निनोमुळं पावसाचा अंदाज काहीही सांगितलं गेला असला तरी शेतकऱ्यांनी लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य पद्धतीने नियोजन करायला पाहिजे असे जडे म्हणाले.
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवडीची घाई करु नये
पूर्व हंगामी कापूस लागवड करताना ठिबक सिंचन करायला हवे. त्यात बेड करुन ही लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणे शक्य असल्याची माहिती बाळकृष्ण जडे यांनी दिली. मात्र, त्यापूर्वी योग्य पद्धतीने नांगरनी वखरणी करून जमिनीची मशागत करायला पाहिजे. त्यात योग्य प्रमाणत शेणखत आणि बेसल डोस घेणं आवश्यक असल्याचे जडे म्हणाले. बेडवर कापूस लागवड केली तर पाऊस जास्त झाला तरी तो सरीच्या माध्यमातून पाणी बाहेर पडण्यास मदत होणार आहे. कमी पाऊस झाला तर बेडमधे वाफसा अवस्था राहणार असल्यानं त्याचा फायदा पिकाला होणार असल्यानं बेड करणे आवश्यक असल्याचं मत जडे यांनी व्यक्त केलं. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करण्याची घाई करु नये असेही जडे म्हणाले.
एकरी दहा हजार झाडे बसतील अशा पद्धतीनं लागवड करावी
एकरी दहा क्विंटल कापूस उत्पादन घेण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी एकरी दहा हजार झाडे बसतील अशा पद्धतीने झाडांची लागवड करायला हवी. त्यासाठी उभ्या वाढणाऱ्या आणि कमी कालावधी असलेल्या वाणांची निवड करण्यात यावी. ठिबक सिंचनाद्वारे कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकरी सहा ते सात हजार झाडे बसतील अशा प्रमाणात ही लगवड करावी. त्यांनी पसरणाऱ्या कापूस वाणांची लागवड केली आणि वॉटर सोल्युबल खतांचा उपयोग केला आणि योग्य पद्धतीने नियोजन केलं तर 20 क्विंटल कापूस घेणं शक्य असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: