success story : शेती करताना शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं नवनवीन संकट येत आहेत. मात्र, या संकटाचा सामना करत काही शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने लिंबाच्या 10 झाडापासून लाखोचं उत्पन्न घेतलंय. शेतात असणाऱ्या लिंबाच्या फक्त 10 झाडांपासून शेतकऱ्यानं तीन लाख रुपयांचा उत्पन्न घेतलं आहे. पाहुयात या शेतकऱ्याची यशोगाथा.


बिहारमधील गया येथील केसापी गावचा शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी सुरुवातीला त्यांच्या शेतात लिंबाच्या 10 झाडांची लागवड केली आहे. यातून त्यांना वर्षभरात भरघोस उत्पन्न मिळत आहे. या 10 झाडापासून रामसेवक प्रसाद यांना वार्षिक तीन लाख रुपयांचा उत्पन्न मिळत आहे. या लिंबाच्या शेतीमुळं त्यांचं जीवन सुखाचे झाले आहे. विशेष म्हणजे रामसेवक प्रसाद यांच्या बागेतील झाडांना वर्षभर लिंबाची फळे येतात. रामसेवक हे कधीच झाडाचे लिंबू तोडत नाहीत, जेव्हा लिंबू झाडावरुन पडते, तेव्हाचे ते विक्रीसाठी बाजारात नेतात.  


एका लिंबाच्या झाडापासून 30 हजार रुपयांचे उत्पन्न


शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाच्या झाडाला लागवडीनंतर चार वर्षांनी फळे येऊ लागली. आता सध्या रामसेवक यांना एका लिंबाच्या झाडापासून वर्षभरात 25 ते 30 हजार रुपये मिळत आहेत. अशा प्रकारे 10 झाडांपासून लिंबू विकून रामसेवक यांना वर्षभरात तीन लाख रुपये मिळत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या लिंबाच्या झाडाची उंची 20 फुटांपेक्षा जास्त आहे.  येत्या काही वर्षांत लिंबाचे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती रामसेवक प्रसाद यांनी दिली.


रासायनिक खतांचा वापर नाही


रामसेवक प्रसाद यांनी त्यांच्या शेतात लिंबाची आणखी 50 झाडे लावली आहेत. विशेष बाब म्हणजे रामसेवक प्रसाद हे त्यांच्या शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाहीत. शेण खतांचा वापर करतात. त्यांची लिंबाची शेती ही झिरो बजेटची आहे. 


गया जिल्ह्यातल शेतकरी करतायेत आंबा, लिंबू, केळी, पेरूची लागवड


बिहारमधील शेतकरी हे भात, गहू, कडधान्ये आणि तेलबिया यांसारखी पारंपारिक पिके घेतात असे लोकांना वाटते. परंतू ते बरोबर नाही. कारण बिहारमधील शेतकरी आता फलोत्पादनाचीही यशस्वी शेती करत आहेत. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. विशेषत: गया जिल्ह्यात शेतकरी आता आंबा, लिंबू, केळी, पेरू आणि ब्लॅकबेरीची लागवड करत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलं आहे. रामसेवक प्रसाद यांनी लिंबाची शेती सुरु करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आता त्यांच्या जवळचे इतर शेतकरीही त्याच्याकडून लिंबू लागवडीची माहिती घेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : टोमॅटोनं केलं लखपती, एकरात घेतलं 20 लाखांचं उत्पन्न; वाचा पुरंदरच्या शेतकऱ्यांची यशोगाथा