Agricultural Export : मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत (Agricultural Export) वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 यादरम्यान कृषी निर्यात 43.37 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 40.90 अब्ज अमेरिकी डॉलर होती. यावर्षी कृषी निर्यातीत 6.04 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.


निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी फार्मर कनेक्ट पोर्टल 


शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी, सरकारनं शेतकरी उत्पादक संस्था, कंपन्या आणि सहकारी संस्थांना निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी मंच उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी फार्मर कनेक्ट पोर्टल सुरू केले आहे. कृषी निर्यात वाढल्यानं शेतकऱ्यांची प्राप्ती सुधारते आणि त्यांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होतो, असंही मंत्रालयानं सांगतलं आहे.


कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न 


कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी शासनानं राज्य आणि जिल्हा स्तरावर पावले उचलली आहेत. राज्य विशिष्ट कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यस्तरीय देखरेख समित्या, कृषी निर्यातीसाठी नोडल एजन्सी आणि क्लस्टर स्तर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी निर्यात धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार जिल्ह्याचा निर्यात केंद्र उपक्रम म्हणून वापर करत आहे. डीईएच उपक्रमांतर्गत, देशभरातील सर्व 733 जिल्ह्यांमध्ये निर्यात क्षमता असलेल्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांसह उत्पादने निवडण्यात आली आहेत. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य निर्यात धोरण तयार करण्यात आले आहे. कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाचे कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात प्रोत्साहन उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.   अपेडा ही 'कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात प्रोत्साहन योजना' लागू करते. विविध विकासात्मक उपक्रम हाती घेतले जातात. यामाध्यमातून निर्यातदारांना योजनेच्या विविध घटकांतर्गत सहाय्य प्रदान केले जाते.


शेतकरी गटांना निर्यात बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न 


अपेडाने (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) कॅनडा, चीन, दक्षिण कोरिया, तैवान, पोर्तुगाल, इंडोनेशिया, इराणमध्ये कृषी उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ उघडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. शेतकरी गटांना निर्यात बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि उद्योजकांना संभाव्य निर्यातदार बनण्यास मदत करण्यासाठी अपेडा विविध कार्यक्रम राबवत आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम देखील होत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Dada Bhuse : पाकिस्तान, बांगलादेशात आर्थिक चणचण, म्हणून कांदा निर्यात कमी, पालकमंत्री भुसेंचे स्पष्टीकरण