Success story : अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात (Agriculture Sector) सातत्यानं बदल होत आहेत. तरुण शेतकरी सातत्यानं आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची एक कंपनी स्थापन केली आहे.  


ऋतुराज शर्मा या तरुणाने गुडगावमध्ये Zettafarms ही कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी कॉर्पोरेट शेती करत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा आहेत. B.Tech आणि MBA केल्यानंतर ऋतुराजने नोकरीऐवजी Startups ने सुरुवात केली आहे.  Zettafarms हा त्यांचा तिसरा स्टार्टअप आहे. या कंपनीने कृषी क्षेत्रात यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. जाणून घ्या झेटाफार्म्स काय काम करते आणि शेतीतून करोडो नफा कसा कमावत आहे.


Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 


Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून त्यामध्ये सुमारे 60 पिके घेतली जातात. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती करतात.


ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?


ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीकडे पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती सुरू केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला पण नंतर झपाट्याने काम वाढवले. 


Zettafarms चे यशाचे मॉडेल काय ?


एका ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms पीक विविधतेवर काम करते. वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात.


झेटाफार्म्स केंद्रीकृत व्यवस्थापनासह कार्य करतात ज्यामुळे त्यांचे शेतीचे काम सर्वत्र अतिशय कार्यक्षमतेने केले जाते. 


Zettafarms टीममध्ये ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स मधील सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे.


शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. 


तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान अॅप्स आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारचे डेटा विश्लेषण वापरतात.


झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम करतो.


ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते जोखीम व्यवस्थापन देखील समाविष्ट करतात.


औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. झेटाफार्म्स शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी काम करत आहे.


झेटाफार्म्सची योजना काय आहे?


ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात ऋतुराज शर्मा व्यस्त आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


मशरुमच्या शेतीचा यशस्वी प्रयोग, दरमहा होतेय लाखोंची कमाई; शेतकऱ्याने दाखवला यशाचा मार्ग