Urvi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या सिनेमांपेक्षा हटके फॅशन स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फी ट्रोल होणं हे काही नवं नाही. विचित्र फॅशन आणि बोल्ड वक्तव्यामुळे उर्फी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तिचा प्रत्येक खूप खूप खास असतो. उर्फीच्या लेटेस्ट टॉपलेस फोटोने (Urfi Javed Latest Photo) सोशल मीडियावर आग लावली आहे. अल्पावधीतच हा फोटो व्हायरल झाला आहे.


उर्फी जावेदचा फोटो व्हायरल (Urfi Javed Photo Viral)


उर्फी जावेदच्या लेटेस्ट फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उर्फीने कोणताही टॉप घातलेला दिसत नाही. एका बाथटबमध्ये ती उभी असलेली दिसत आहे. अभिनेत्रीने फक्त जीन्स परिधान केली आहे. उर्फीचा हा अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.


उर्फीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव 


उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे आणि चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असते. आता टॉप न घातलेल्या तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जन्माला आली तशीच आजही फिरते, उर्फीला तिचे आई-वडील काही बोलत नाहीत का?, उर्फी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे, मला उर्फी खूप आवडते, पलट, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. दररोज न चुकता चाहत्यांसोबत ती बोल्ड व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. उर्फीचे चाहतेदेखील तिच्या वेगवेगळ्या लूक्सची प्रतीक्षा करत असतात. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकने मात्र चांगलाच धमाका केला आहे.


उर्फीने आता 'टॉपलेस' फोटो शेअर केला असला तरी याआधी तिने कधी प्लॅस्टिक कधी वायर, पिझ्झा आणि काचांपासून तयार केलेले ड्रेस परिधान केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी उर्फी काहीही करू शकते. 


उर्फी जावेद कोण आहे? (Who is Urfi Javed)


उर्फी जावेद हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्फी आता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असली तरी छोटा पडदा मात्र तिने चांगलाच गाजवला आहे. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीझन 2, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाचं पहिलं पर्वदेखील तिने गाजवलं आहे. तसेच MTV Splitsvilla मध्येही ती सहभागी झाली होती. अभिनेत्री असण्यासोबत ती एक उत्तम मॉडेल आहे. अनेक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


VIDEO: वायर,काचा आणि पिझ्झानंतर आता माशी; उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा