Makardan Anaspure : शेतकऱ्यांचा माल आहे म्हटलं की त्याची बार्गेनिंग सुरु होते. पण एखाद्या मॉलमध्ये वस्तू घेताना बर्गेनिंग केलं जातं नाही अशी खंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांकडे पिकवायची क्षमता आहे. पण साठवून ठेवू शकत नाही, म्हणून त्याचा माल कवडीमोल भावाने विकावा लागतो असेही मकरंद अनासपुरे म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांनी सामूहिक शेती सुरु करावी
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषिक 2025 हे भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनाची पाहणी आज मकरंद अनासपुरे यांनी केली. यावेली त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीचे प्रश्न मांडले. शेतकऱ्यांनी शेतीची पद्धत बदलावी तसेच सामूहिक शेती सुरू करावी. शेतमालाच बार्गेनिंग केलं जातं परंतु एखादा मॉलमध्ये वस्तू घेताना बर्गेनिंग केलं जातं नाही असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दरानं घेतला जात आहे, त्यामुळं सरकारनं शेतमालाचे हमीभाव ठरवावेत अशी मागणी यावेळी अनासपुरे यांनी केली.
महाराष्ट्र हा जातीपातीत वाटून चालणार नाही, सगळ्यांनी एकत्र राहूनच काम केलं पाहिजे
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची संदर्भात देखील मकरंद अनासपुरे यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, सैफ अली खान काय कुणावरही अशा पद्धतीचा हल्ला झाला तर त्याचा निषेधच आहे. या प्रकरणची चौकशी होऊन कडक असे शासन झालं पाहिजे अशी मागणी देखील मकरंद अनासपुरे यांनी केली. तसेच महाराष्ट्र हा जातीपातीत वाटून चालणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहूनच काम केलं पाहिजे अशी भावना मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.
20 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भव्य असं कृषी प्रदर्शन भरलं आहे. दिनांक 16 जानेवारीपासून हे प्रदर्शन सुरु झालं आहे. 20 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती क्षेत्रात चांगले प्रयोग करण्यात आले आहेत. AI च्या वापर करुन यशस्वी अशा प्रकारे ऊस शेती करण्यात आली आहे. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Success story: ऊसाला फाटा देऊन 2.5 एकरात फुलवला आल्याचा मळा! नगरचा शेतकरी मिळवतोय 15 लाखांचे उत्पन्न