Fertiliser News : सध्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. त्यामुळं शेतकरी खते, बी बियाणांची खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या मुद्यावरुन माढा तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा करुन शेतकऱ्यांना ज्यादा दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेनं केली आहे.


प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं माढा तालुक्यातील रासायनिक खतांचा कृतिम तुटवडा करुन शेतकऱ्यांना ज्यादा दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याबाबत तालुका कृषी कार्यालय यांच्यासोबत चर्चा करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. जे दुकानदार शेतकऱ्यांना गरज नसलेले खत देत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच तालुक्यातील सर्व खत दुकानांची तपासणी केली आहे, अजूनही तपासणी करण्याचे लेखी आश्वासन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.


शेतकऱ्यांनी हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा


लिंकिंगद्वारे खतांची विक्री न करता शेतकऱ्यांना जी गरजेची खते आहेत ती देण्यात यावी. याबाबत दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे त्यांनी हेल्पलाईन नंबर 180023340000 यावर कॉल करुन आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे पदधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी सांगितले. यावेळी माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, युवा तालुका संपर्क प्रमुख सुयोग कदम उपस्थित होते.


काही ठिकाणी दुकानदारांकडून रासायनिक खतांची साठेबाजी देखील होत आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना वाढीव दरानं खतांची विक्री केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना गरज नसणाऱ्या खतांची बळजबरीनं विक्री केली जात आहे. अशा खत दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या: