नासाकडून पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 10:41 AM (IST)
1
नासाने पृथ्वीसारख्याच एका नव्या घराचा शोध लावला आहे. या ग्रहाचं प्रॉक्झिमा बी असं नामकरणही करण्यात आलं आहे.
2
हा नवा ग्रह पृथ्वीपासून 4.2 प्रकाशवर्ष दूर आहे.
3
हा ग्रह पृथ्वीपासून जवळ असल्याने संशोधन करणं सोपं होणार आहे.
4
2013 साली पहिल्यांदा या ग्रहाचं अस्तित्त्व जाणवलं होतं.
5
प्रॉक्झिमा बी वर पाण्याच्या अस्तित्त्वाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
6
आतापर्यंत शोधल्या गेलेल्या 3500 ग्रहांपेक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
7
स्वत:च्या सूर्याभोवती 11 दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. पृथ्वीला याच प्रदक्षिणेसाठी 365 दिवस लागतात.
8
प्रॉक्झिमा बी पृथ्वीपेक्षा 1.3 पटीने मोठा आहे.