सुषमा स्वराज 'त्या' पाकिस्तानी मुलीला म्हणतात...
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करुन भारतीय संस्कृतीचा दाखला देत, आलियासाठी चिंतीत असल्याचं म्हटलं होतं. तसेच सर्वांच्याच मुली असतात असेही त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमधून सुषमा स्वराज यांच्या भेटी बद्दल माहिती दिली. ती म्हणाली की, माझी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मायदेशी परतण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे.
मात्र, पीओकेवरील सर्जिकल स्ट्राईकमुळे त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
याला उत्तर देताना आलियाने म्हटलं होतं की, आपल्याला सुषमा स्वराज यांनी मुलीचा दर्जा दिला हा मोठा आधार होता. तसेच तिने आपला गट सुखरुप मायदेशी परतला असल्याचंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
यानंतर तिने ट्वीट करुन सर्व भारतीय पाहुण्यांना ईश्वराचा दर्जा देतात असे म्हटलं.
दरम्यान 1 ऑक्टोबर रोजी आगाज-ए-दोस्तीच्या अलिया हरिरने सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्वराज यांनी त्यांना स्वगृही पाठवण्याचे आश्वासन दिले.
या संबंधित तरुणांच्या कुटुंबियांनी त्यांना मायदेशी परतण्याचा तगादा लावला होता.
या फेस्टीव्हलमध्ये पाकिस्तानातील 19 जणांच्या एका टीमने सहभाग घेतला होता. ते 4 ऑक्टोबर रोजी मायदेशी परतणार होते.
यानंतर भारतातील गर्ल्स फॉर पीस ग्रुपच्या पाकिस्तानी तरुणींना तत्काळ विशेष संरक्षण दिले होते.
पाकिस्तानी तरुणांच्या शिष्ठमंडळानेही सुषमा स्वराजांचे याबद्दल आभार मानले आहेत.
गेल्या 27 सप्टेंबर रोजी चंदीगढमध्ये झालेल्या ग्लोबल यूथ पीस फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने पीओकेवर केलेले यशस्वी सर्जिकल स्ट्राईक यामुळे भारत-पाक संबंध कमालीचे ताणले आहेत. मात्र, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे एका कार्यक्रमानिमित्त भारतात आलेले पाकिस्तानी तरुण आपल्या मायदेशी परतले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -