जगातील 'या' देशांकडे सैन्यबळच नाही
समोआ या देशाकडेही स्वत:चं सैन्यबल नाही. मात्र, आवश्यकता असल्यास न्यूझीलंडने या देशाला युद्धात मदतीचं आश्वासन दिलं आहे.
ओशानिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागात नौरु हा देखील एक अलिप्त देश आहे. पण या देशाकडेही स्वत:चं सैन्यबळ नाही.
कॅरेबियन सीवर वसलेलं ग्रेनेडा हा एक अलिप्त देश आहे. पण या देशाकडे स्वत:चे सैन्यबळच नाही.
मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशातही सैन्यबल नसल्याने युद्धाला तोंड फुटल्यास हा देश त्याचा सामना करु शकत नाही.
युरोपमधील अंडोरा या देशाकडेही स्वत:चं सैन्यबळ नाही. मात्र, जर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास, स्पेन आणि फ्रान्स हे देश युद्धासाठी मदत करु शकतात.
जगातील सर्वच देशांकडे सैन्यबळ आहे. त्यामुळे युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास ते देश आपल्या सैन्य बळाच्या जोरावर शत्रू राष्ट्राचा समर्थपणे मुकाबला करु शकतात. पण जगात काही देश असेही आहेत, ज्यांच्याकडं सैन्यबळच नाही.