भर कार्यक्रमात गोळ्या घालून रशियाच्या राजदुताची हत्या
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी हल्ल्याचे फोटो काढले.
हल्लेखोर स्वतःला पोलिस अधिकारी सांगून कार्यक्रमात शिरल्याची माहिती आहे.
हल्लेखोराने कार्लो यांनी गोळ्या घातल्यानंतरही त्याच ठिकाणी उभा राहून घोषणाबाजी केली.
सुटाबुटात आलेल्या हल्लेखाराने सर्वांसमोर कार्लो यांच्यावर बेछूटपणे गोळीबार केला.
गोळीबारानंतर उपस्थित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
सीरियाच्या बाबतीतील रशियाची भूमिका पाहता तुर्कीमध्ये अनेक दिवसांपासून विरोध प्रदर्शनं चालू होती. त्यानतंर हा हल्ला झाला आहे.
या गोळीबारात अन्य काही लोकही जखमी झाले असल्याचं वृत्त एनटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलं आहे.
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये कार्लो एका प्रदर्शनासाठी गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला.
तुर्कीमध्ये रशियाचे राजदूत आंद्रे कार्लो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
दरम्यान या हल्ल्यानंतर रशियाने तातडीची बैठक बोलावली आहे.