फिलिपाईन्समध्ये कसिनोवर हल्ला, 36 जणांचा मृत्यू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वर गोळी झाडली. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच त्याच्याकडून एक मशीनगन आणि 380 कॅलिबर बंदूक सापडली आहे.
ऑटोमेटिक रायफलचा धाक दाखवून त्यानं तेथील सुरक्षारक्षकांना घाबरवलं. त्यानंतर काहीच वेळानं कसिनोतून गोळीबाराचाही आवाज आला. थोड्याच वेळात इमारतीतून धुराचे लोळ पाहायला मिळाले. अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
हे सर्व मृतदेह रिसॉर्टमधील कसिनो परिसरात सापडले आहेत. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचं म्हटलं आहे. पण प्रत्यक्षदर्शींच्या मते, एक हल्लेखोर बंदुकीसह रात्री कसिनोमध्ये शिरला होता.
मृतांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.
येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीतील धुरामुळे गुदमरुन लोकांचा मृत्यू झाला आहे.
फिलिपाईन्सची राजधानी मनीलामध्ये एका कसिनोमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -